*पाणंद रस्त्याची कामे लवकर सुरू करा* *आमदार आवताडे यांच्या आढावा बैठकीत सूचना*

प्रतिनिधी/प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांशी जनतेसाठी शेती हे उपजीविकेचे आणि उत्त्पन्नाचे प्रमुख साधन आहे. शेती उत्त्पन्नातून तयार होणारे अर्थचक्र अनेकांच्या कौटुंबिक विकासासाठी महत्वाची बाब आहे मात्र अनेक ठिकाणी रस्त्याविना शेती नापीक ठेवण्याची वेळ येते ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासन नियोजन विभाग (रोहयो विभाग) संलग्न महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत आणि पाणंद रस्ते योजने अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील शेत आणि पाणंद रस्ते निर्मितीसाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर मंजूर असून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कामे रखडली होती या कामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवेढा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मंगळवेढ्याचे गटविकास अधिकारी शिवाजी पाटील,पंढरपूरचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नायब तहसीलदार हेडगिरे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे गुंड, जिल्हा परिषदेचे नंदकुमार कोष्टी, लवटे,यांचे सह ग्रामसेवक सरपंच यांच्या समवेत आढावा बैठक घेऊन आमदार आवताडे यांनी कामे तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना आमदार समाधान अवताडे म्हणाले की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत आणि पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या सन २०२२ - २३ या अर्थिक वर्षाच्या पुरवणी नॉनप्लॅन आराखडा अन्वये हा निधी मंजूर झाला आहे. मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध शेत आणि पाणंद रस्ते निर्मितीसाठी हा भरीव निधी मंजूर झाल्याने अनेक पाणंद रस्ते निर्मितीस चालना मिळणार आहे. या योजनेखाली मंजूर झालेल्या प्रत्येक पाणंद रस्त्यासाठी प्रत्येकी २४ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. दळणवळणासाठी मुख्य बाब रस्ता आहे ही गरज लक्षात घेऊन नागरिकांना शेतीकडे जाण्यासाठी आवश्यक तो रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी निधी आणला असून याची कामे तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आमदार अवताडे यांनी दिल्या यावेळी मंगळवेढा तालुक्यातील रहाटेवाडी,सलगर खुर्द, ढवळस,उचेठाण,यड्राव,मरवडे,लोणार, महमदाबाद(हु) डोंगरगाव,अरळी,खूपसंगी, बोराळे,मारापुर, चोखामेळानगर तर पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव,रांजणी, शेटफळ,लक्ष्मी टाकळी,अनवली,खर्डी,कोर्टी, तावशी,मुंढेवाडी, शिरगाव,बोहाळी, कौठाळी,गोपाळपूर या गावांचा आढावा घेण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, मा मिस्टर सभापती सुधाकर मासाळ, डोंगरगाव चे सरपंच विवेक खिलारे,बापू मेटकरी,रावसाहेब चौगुले यांचेसह विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते.