*जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या हकालपट्टीसाठी सर्व पदाधिकारी यांच्यात झाले एकमत* *अनेक तालुका आणि शहर प्रमुखासह जबाबदार पदाधिकारी यांची मागणी* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उपनेते आ.भरतशेठ गोगावले यांच्याकडे भेटून केली आहे मागणी*

पंढरपूर/प्रतिनीधी
शिवसेना पंढरपूर विभागाचे निष्क्रिय जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांना केवळ सहा महिन्याची मुदत देऊन, जिल्हाप्रमुख पद देण्यात आले होते. या सहा महिन्याच्या कालावधीत चवरे यांनी त्यांच्याकडे कार्यक्षेत्र असलेल्या कोणत्याही तालुक्यात जाऊन आपली जबाबदारी पार पाडण्याचे काम केले नाही. त्यामधे ते पूर्णतः अपयशी ठरले आहेत. यामुळे आशा निष्क्रिय जिल्हाप्रमुख असलेल्या चरणराज चवरे यांना जिल्हाप्रमुख पदावरून पदमुक्त करून नव्याने जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात यावे. अशी मागणी जिल्ह्यातील अनेक शिवसेनेचे तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्ह्यातील जबाबदार पदाधिकारी यांनी लेखी तक्रारवजा निवेदनद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उपनेते आ.भरतशेठ गोगावले, सचिव संजय मोरे यांचेकडे समक्ष भेटून केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात आपल्या कारकीर्दीत मोठ मोठ्या विकासकामांचा आणि विविध योजनांचा धडाका सुरू केला आहे. या कामाचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुख यांनी कधीही केल्याचे दिसून आले नाही. केवळ या भागातील इतर पदाधिकारी यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थिती दाखविली नाही. एवढेच काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला होता. त्यामध्येही कुठ उपस्थिती जाणवली नाही. कधीही शिवसेना वाढीसाठी कुठेही बैठक घेतली नाही. असा ठपका ठेवत अनेक पदाधिकारी यांनी आता जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांचे सोबत काम करण्यास नकार दर्शविला आहे. यामुळे चवरे यांचे जिल्हाप्रमुख पद धोक्यात आले आहे.
या देण्यात आलेल्या तक्रारी निवेदनात चवरे यांनी केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्याची भूमिका आजवर पार पाडली आहे. त्यांनी ठेकेदारी आणि अधिकारी बदली यामध्ये आपला रस दाखवीत आर्थिक स्वार्थ साधण्याचांच केवळ प्रयत्न केला असल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या निष्क्रिय जिल्हाप्रमुख चवरे यांची पदावरून हकालपट्टी होणार हे दिसून येणार आहे.
जिल्हाप्रमुख चवरे यांच्यासाठी अनेक पदाधिकारी यांनी रेटा लावला असून यामध्ये सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, जिल्हा उपप्रमुख महावीर देशमुख, जिल्हा सह संपर्क प्रमुख सुधाकर कवडे, उत्तर सोलापूर तालुका प्रमुख सुधीर गोरे,यांच्यासह पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर, शहर प्रमुख विश्वजित उर्फ मुन्ना भोसले, सांगोला तालुका प्रमुख दादासो लवटे, माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील,पंढरपूर विभागाचे युवासेना जिल्हा उपप्रमुख सत्यवान मोरे, यांच्यासह अनेकांनी लेखी तक्रारवजा निवेदन देत पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
यामुळे लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
चौकट
*चवरे यांच्या विरोधात मोहोळ तालुक्यातून उठाव*
शिवसेना पंढरपूर विभागाचे जिल्हा प्रमुख चरणराज चवरे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील विविध तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांची नाराजी ओढवली आहे. मात्र त्यांच्या स्वतःचे मोहोळ तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनीही झिडकारले असून, तब्बल ३०० कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी एकत्रीत तक्रारवजा निवेदन देत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे चवरे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. त्यामुळे चवरे यांच्या विरोधात मोहोळ भागातील कार्यकर्ते तक्रार करीत असतील तरचवरे यांना आलेले हे मोठे अपयश आहे. असेच म्हणावे लागेल.या तक्रार दिलेल्या पदाधिकारी यांच्यामध्ये उ.बा.ठा गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत आलेल्या शिवसेना पदाधिकारी यांचा समावेश आहे. यामध्ये दादासाहेब पवार, प्रकाश पारवे, दादासाहेब करणावर, समाधान खंदारे, प्रभाकर चव्हाण, सुनील खंदारे, यांचेसह तब्बल ३०० कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते आ.भरतशेठ गोगावले, शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्याकडेच मागणी केली आहे.