*गडकरी साहेब... करकंब च्या खडतर रस्त्याकडे लक्ष असू द्या....*! *नगर विजापूर नियोजित राष्ट्रीय महामार्ग असूनही रुंदीकरण नाही*. *संत एकनाथ , संत निवृत्तीनाथ या संतांच्या पालख्या बरोबरच लहान-मोठ्या पालख्या नगर आणि विदर्भातून*

करकंब /प्रतिनिधी
देशाचे केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब हे दिनांक 30 रोजी पंढरपूर येथे येणार असल्यामुळे त्यांच्या येण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात वायरल होत आहे. गडकरी साहेब यांनी देशांमध्ये रस्ते विकासाच्या बाबत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्याने रस्ते दळणवळणास चालना मिळत गेली, त्यांनी केलेल्या कार्याची नेहमीच सोशल मीडिया व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व स्तरातून कौतुक व चर्चा होत असताना चित्र पाहावयास मिळते. केंद्रीय मंत्री होण्यापूर्वी नामदार नितीनजी गडकरी साहेब यांनी माढा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हेलिकॉप्टर मधून करकंब मध्ये हवाई नगर प्रदर्शना करून करकंब येथील मोडनिंब रोड येथे भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेस चे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ जाहीर सभाही घेतली होती. यावेळी नामदार शरच्चंद्र पवार साहेब व सुभाष देशमुख यांच्यामध्ये या माढा लोकसभा मतदारसंघात लढत झाली होती. या लढतीत भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी निकराने झुंज देऊन शरद चंद्र पवार साहेब यांना करकंब गावात मायनस मध्ये ठेवले होते. ही बाब खुद्द शरद पवार साहेब यांनी पंढरपूर कडे जात असताना करकंब च्या काही नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भेटी वेळी ही बाब जाणीवपूर्वक लक्षात आणून दिली होती.
त्यानंतरच्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये नरेंद्र मोदी ची लाट देशांमध्ये सुरू असताना नामदार विजयसिंह मोहिते पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. यावेळी राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ करकंब मध्ये प्रचारास उतरले होते. जे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे होते तेच आज भाजपात आहेत, पण गडकरी साहेब करकंब चे रस्ते मात्र आजही खडतरच आहेत. तुमचेही करकंब कडे जरा लक्ष असू द्या, करकंब लगत नगर विजापूर राष्ट्रीय महामार्ग मार्ग असून या महामार्गाची रुंदी वाढवण्याची गरज आहे. या रस्त्यावरून पाच सहकारी साखर कारखान्यांचे ऊस वाहतूक, रोजची रहदारी, दिल्ली ते बेंगलोर अशी मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे. या महामार्गावरून व करकंब गावातून संत एकनाथ संत निवृत्तीनाथ आदि विविध संतांच्या लहान-मोठ्या पालख्या दिंड्या जातात व येत असतात. त्यामुळे या महामार्गाची व या महामार्गाला करकंब ला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची अत्यंत दयनीय व खडतर अवस्था झालेली आहे यापूर्वी या माढा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते. पंढरपूर विधानसभा व माढा विधानसभा पुनर्रचित ची नेतृत्वही यापूर्वीही राष्ट्रवादीने केलेले आहे तरीही गडकरी साहेब या भागातील रस्ते अत्यंत दुर्गम आणि खडतर झालेले आहेत, तुम्ही पंढरपुरात येणार आहात तर करकंब च्या या दुर्गम आणि खडतर रस्त्याकडेही लक्ष असू द्या असे करकंब आणि माढा -पंढरपूर मतदार संघातील सर्वसामान्य लोकांमधून शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.