*अखेर चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिला धपका!* *विठ्ठलचा सुधारित ऊस दर जाहीर*  *विठ्ठल परिवार पूर्वपदावर*

*अखेर चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिला धपका!*  *विठ्ठलचा सुधारित ऊस दर जाहीर*   *विठ्ठल परिवार पूर्वपदावर*

पंढरपूर/प्रतिनीधी

पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार यामधून आपल्या गटाच्या कारखान्यामध्ये येणाऱ्या उसाला भाव देण्याची स्पर्धा लागली आहे. अशातच देशाचे नेते खा. शरद पवार यांच्या समोरच जाहीर केल्याप्रमाणे विठ्ठल सहकारी साखर कारखानाचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी आता  ऊस दर वाढवीत सुधारित दर जाहीर केल्याने विठ्ठल परिवार पूर्वपदावर आल्याचे दिसून आले आहे.


     
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा 2023/24 गळीत हंगामासाठी आलेल्या ऊसाला यापूर्वी चेअरमन अभिजीत पाटील यांनी जाहीर केला होता. दर देण्याच्या स्पर्धेत आपला विठ्ठल परिवार मागे पडू नये यासाठी मोठे धाडस दाखवीत वाढीव दर जाहीर केले आहेत.


या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या दरात पहिला हप्ता 2825 रुपये जाहीर करण्यात आला आहे.
यामध्येही अजून एक वाढीव संधी देत नोव्हेंबर 2825,
डिसेंबर 2850,
जानेवारी 2900,
फेब्रुवारी 2950,
मार्च 3000,
असे नव्याने दर जाहीर केले आहेत.
वरील प्रमाणे दर वाढीव देऊनही श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या ऊसाचे 
कुठेही वजन काटा करुन  आणावे असेही आवाहन केले आहे. यामुळे अल्पावधीत विस्वसास पात्र ठरत असलेल्या चेअरमन अभिजीत पाटील यांचे विठ्ठल परिवारातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे.

    सध्या विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार या दोन गटातून ऊस दर चढाओढीने वाढविले जात आहेत. याचा लगत असलेल्या साखर कारखानदार यांची दमछाक होणार आहे. हे मात्र पक्के आहे.