*गादेगाव येथे माने परीवार यांच्या वतीने "नागेशदादा फाटे पाणपोई" उद्घाटन संपन्न* ..

पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर व उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून माने परिवाराच्या वतीने मा .नागेशदादा फाटे यांचे सार्वजनिक कार्य पाहून , गरजूंना मदत , महाराष्ट्र राज्यातील दादांच्या कार्यला प्रेरित होऊन आपणही सार्वजनिक कार्यात थोडासा हातभार म्हणून *श्री नागेशदादा फाटे यांच्या नावे पाणपोई* चे उद्घाटन
माने परिवाराच्या वतीने करण्यात आले याच वेळी औदुंबर माने व शशिकांत माने यांनी सुरु केलेल्या *संकल्प मेन्स वेअर* चे ही उद्घाटन करण्यात आले .
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष मा . नागेशदादा फाटे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह. सा.कारखाना माजी संचालक मा. संभाजीकाका बागल, मा . बाळासाहेब जालिंदर बागल , गादेगावचे माजी सरपंच मा . भारत बागल ,उद्योगपती मा . अंकुश गव्हाणे, उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे, सतीश बागल, संजय कदम ,आकाश मांडवे , आण्णा मोलाणे , ओंकार फाटे , अभिमन्यू पवार, समाधान दत्तू माने, शुभम जगताप आधी ग्रामस्थ उपस्थित होते.