*माढा उपजलसिंचन योजना क्रमांक 8चे रखडलेले काम सुरू* *मनसेचे जिल्हाप्रमुख प्रशांत गिड्डे यांच्यासह पदाधिकारी यांच्या मध्यस्थीला आले अखेर यश*

पंढरपूर:-प्रतिनिधी
माढा उपजलसिंचन योजना क्र 8 चे रखडलेले काम काही शेतकरी व शासकीय कार्यालय, गावचे लोकप्रतिनिधी याच्यां संघर्षात रखडले होते .आज पर्यंत दहा वेळा काम चालू झालेअन बंदही झाले होते.
त्यासाठी आज सोलापूर मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे ,व विद्यार्थी सेना अध्यक्ष राहुल सुर्वे यांच्या मध्यस्थीमार्फत त्यासाठी पाठपुरावा करताच यासाठी यश मिळाले असून कामही चालू झाले आहे.
हे काम चालु करण्यात आले असून त्याचे पूजनही जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
देवकरसाहेब,करडे रावसाहेब ,अँड विकास(नाना)पाटील, शेतकरी प्रतिनिधी ब्रम्हदेव पाटील,रावसाहेबनाना पाटील,मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष राहुल सुर्वे,काँग्रेस माढा तालुकाध्यक्ष सौदागर(दादा) जाधव,कृषी उत्पन्न बाजार समिती मा सभापती मोहन(भाऊसो)मोरे,
बैरागवाडी सरपंच गणेश सुर्वे,उपसरपंच, दत्तात्रय सुर्वे,रावसाहेब सुर्वे,सिद्धेश्वर सुर्वे,राजाभाऊ सुर्वे,मा उपसरपंच गोरख चोपडे,नाना बिनगे,रोहिदास माने,हनुमंत सुतार,
रतिलाल सुर्वे,विक्रम माने,संजय सोमासे,अरुण मोरे,नितीन सुर्वे,इ बैरागवाडी,जाधववाडी ग्रामस्थ उपस्थित होते.