*लोकांच्या समोर मत मागायची औकात राहिली नाही-अमरजीत पाटील.* *हीच निवडणूक तुमचा आमचा प्रपंच बदलण्याची*

करकंब /प्रतिनिधी :
-श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्याचे विद्यमान चेअरमन व्हाट्सअपग्रुप वरून आपल्या पॅनलचा कपबशीचे मत मागण्याचा केविलवाना प्रयत्न करीत असून लोकांच्या समोर जाऊन मत मागायची औकात आता राहिली नाही . या विद्यमान चेअरमन असलेल्या पठ्ठ्यानं आयुष्यभर साखर वाटली नाही... बिल दिली नाहीत ....आणि चिन्ह घेऊन आलाय.. कप बशी अशी घणाघाती प्रहार केला.
अण्णा भाऊ शेतकरी विकास पॅनल च्या करकंब येथील केलेल्या आयोजित जाहीर सभेत बोलताना केला.
यावेळी अण्णाभाऊ शेतकरी विकास पॅनल प्रमुख युवराज दादा पाटील, दीपक दादा पवार, एडवोकेट गणेश दादा पाटील, दीपक वाडदेकर, शेतकरी संघटनेचे माऊली हळवणकर, माजी सरपंच दिलीप नाना पुरवत, माजी बाळासाहेब शिंगटे, आदिनाथ दादा देवकते, प्राध्यापक प्रदीप पाटील सर ,विरोधी पक्ष नेते राहुल काका पूरवत, शहाजी मुळे, आदी मान्यवरासह बहुसंख्य पदाधिकारी, ज्येष्ठ शेतकरी सभासद उपस्थित होते.
पुढे बोलताना अमरजीत पाटील यांनी सांगितले की, ही निवडणूक तुमचा आमचा प्रपंच बदलण्याची निवडणूक असून... हीच ती वेळ व ....हीच ती निवडणूक आहे. अण्णांच्या काळानंतर च्या अण्णांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. पण अखेरच्या श्वासापर्यंत अण्णांचा वारस म्हणून आमच्या कुणाकडून आमच्या बाप जाद्याला कलंक लागणार नाही . अशी कदापी भूमिका भविष्यातही करणारही नाही. व अण्णांच्या विचारांना कधीच तडा जाऊ देणार नाही. अशी भावनिक साद घालून ज्या अण्णांच्या काळात सभासद स्वाभिमानाने कारखान्यावर ....नावाकोरा.. फेटा बांधून ....बिल घ्यायला येत होता त्याच ...सन्मानाने... पुन्हा नवा कोरा फेटा बांधून... बिल नेण्याचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या परिवाराकडून सभासदांना लोकांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही.या कारखान्याचा संदर्भात होत असलेल्या विरोधाकाकडून टीकाटिप्पणीवर प्रचंड गर्दी असलेल्या कागदपत्राच्या पुराव्यांशी विद्यमान चेअरमन आणि अण्णा नंतरच्या कार्यकाळानंतर कारखान्याच्या संदर्भात केलेल्या विध्वंसची लेखाजोखा सभासद व लोकांसमोर मांडला.
यावेळी अण्णाभाऊ शेतकरी विकास पॅनल प्रमुख युवराज दादा पाटील यांनीही सभासदांना विश्वासाने एका महिन्याच्या आत टांगा फिरवून विठ्ठल कारखान्याच्या अर्थकारणाला पुन्हा नव्याने व जोमाने आपल्या विश्वासावर निश्चितपणाने सभासद कामगार वर्ग व्यापारी व व सामान्य लोकांच्या अर्थकारणाला चालना देऊन न्याय देण्याची भूमिका घेणार असल्याचे ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी दीपक दादा पवार ,एडवोकेट गणेश दादा पाटील, दीपक वाडदेकर, शेतकरी संघटनेचे माऊली हळवणकर, माजी सरपंच दिलीप नाना पुरवत, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, आदिनाथ दादा देवकते,विरोधी पक्षनेते राहुल पूरवत, आदि सह विविध मान्यवरांनी प्रचंड जनसमुदायास व सभासद वर्गास मार्गदर्शन केले. या सभेचे आलेल्या उपस्थित मान्यवरांचे सभासद ग्रामस्थ यांचे आभार प्राध्यापक प्रदीपपाटील सर यांनी मानले.
या सभेस करकंब ऊस उत्पादक गटासह करकंब व परिसरातील सभासद वर्गणी प्रचंड गर्दी केलेली दिसून आली.