*करकंब येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था जपते सामाजिक बांधिलकी....!* * पत्रकार दिनी पत्रकारचाही केला सन्मान*

*करकंब येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था जपते सामाजिक बांधिलकी....!*  * पत्रकार दिनी पत्रकारचाही केला सन्मान*

करकंब /प्रतिनिधी;

 मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या  जयंतीनिमित्त लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था करकंब शाखेच्या वतीने पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. लोकमंगल शाखेच्या स्थापनेपासून आजतागायत सर्व वार्ताहरांचा सन्मान केला जातो . याप्रसंगी मा. सागर थिटे,  लक्ष्‍मण जाधव, सचिन शिंदे, लक्ष्‍मण शिंदे , विश्वनाथ केमकर , नितीन खाडे या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.  शाखेचे शाखाधिकारी लक्ष्मण बागल यांनी प्रास्ताविक केले . संस्थेचे सल्लागार दत्तात्रय खंदारे यांनी सत्कार करण्यामागील उद्देश व संस्थेच्या कार्याची माहिती सांगितली . तुळशीदास शिंगटे, मुस्तफा बागवान हे सल्लागार उपस्थित होते . विजयकुमार शिंदे, विशाल जाधव ,अभिजित वास्ते यांनी कार्यक्रमाचे  नियोजन केले .