* पंढरीतील कुंभारगल्ली आणि शिंदेंनाईक नगर भागातील रस्त्याचा मागील अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मिटला* *अखेर ..माजी नगराध्यक्षा अन विद्यमान कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर ,कर्तव्यतत्पर नगरसेवक अक्षय गंगेकर आणि लखनदादा चौगुले यांच्या प्रयत्नाने झाले आज चक्क भूमीपूजनच*!

* पंढरीतील कुंभारगल्ली आणि शिंदेंनाईक नगर भागातील रस्त्याचा  मागील अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मिटला* *अखेर ..माजी नगराध्यक्षा अन विद्यमान कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर ,कर्तव्यतत्पर नगरसेवक अक्षय गंगेकर आणि लखनदादा चौगुले यांच्या प्रयत्नाने झाले आज चक्क भूमीपूजनच*!

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील  विकासकामे होत असताना आमच्या  भागातील विकास प्रामुख्याने झाला पाहिजे असा हट्ट धरणाऱ्या प्रभाग क्रमांक1चे नगरसेवक  अक्षय गंगेकर यांनी  खूप प्रयत्न करून शेवटी मागील अनेक वर्षांपासून अनेक अडचणी असलेल्या त्या कुंभारगल्ली आणि शिंदे नाईक नगर भागातील सर्वच रस्ते सिमेंटचे करण्यासाठी मंजुरी तर मिळवलीच परंतु आज बुधवार दि15 डिसेंबर रोजी या सर्व रस्त्याचे चक्क भूमिपूजन करून दाखविले आहे, यामुळे या भागातील जनतेची अनेक दिवसांपासून असलेली मागणी पूर्ण होत असल्याने, जवळपास सर्वच मूलभूत गरजा पूर्ण करीत  गंगेकर यांचा वाचननामा पूर्ण केला आहे.
    आज भूमिपूजन झालेला परिसर हा मागील अनेक वर्षे विकासापासून वंचित होता, याकडे मागील नगरसेवक कधी फिरकलेही नव्हते, परंतु नगरसेवक गंगेकर यांनी यापूर्वीच या भागातील लाईट, पाणीपुरवठा, ड्रेनेज, सह इतर कामे मार्गी लावली होती. परंतु या भागातील उरलीसुरली रस्त्याचीही जी गंभीर स्वरूपाची जी मागणी होती ती मागणी पूर्ण करण्यात त्यांना यश मिळाले आहे.

कुंभारगल्ली आणि शिंदेंनाईक नगर भागातील रस्त्याचा  मागील अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मिटला असून अखेर आज माजी नगराध्यक्षाआणि विद्यमान कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर, कर्तव्यतत्पर नगरसेवक अक्षय गंगेकर ,आणि लखनदादा चौगुले यांच्या प्रयत्नाने आज चक्क भूमीपूजनच झाले आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांतून मोठे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
   प्रभाग क्रमांक 1 मधील कुंभार गल्ली, शिंदे नाईक नगर, इंडस्ट्रीज एरिया या भागातील कॉंक्रीटच्या रस्त्यांचे उदघाटन करताना जेष्ठ नागरिक व जनतेचे लाडके नगरसेवक श्री प्रताप आण्णा गंगेकर, माजी नगराध्यक्षा व विद्यमान कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर, भावी नगरसेवक श्री नागेश काका गंगेकर, नगरसेवक श्री लखन दादा चौगुले, नगरसेवक श्री शंकर काका पवार , माजी नगरसेवक श्री किरणराज घाडगे, समाजसेवक श्री अनिलभाऊ पवार, नगरसेवक श्री अक्षयभाऊ गंगेकर, भावी नगरसेवक श्री निखिलभाऊ गंगेकर, भावी नगरसेवक श्री सुरजभाऊ गंगेकर, भावी नगरसेवक श्री विवेकभाऊ गंगेकर, श्री संगम मेंबर कंकणवार, श्री बालाजी बागल ,श्री मदन तात्या बोंडफळे, श्री माऊली शिंदे, श्री गणेश बागल, शेखर कुंदुर, नरेश पिंगळे, रॉक कुंदूर ,अक्षय घाटे, लखन भिंगारे, अजय भोसले, मोहन सुतार ,गणेश भोसले, टेपू शेख, शुभम लिमकर, रणजित क्षीरसागर ,छोट्या पवार, विठ्ठल पवार ,नागेश सोमवंशी, गणेश सोमवंशी, संतोष शिंदे, दिपक देशमाने, वैभव म्हमाणे, गणेश भोसले ,रोहीत माने, सोमनाथ दुधाळ, यांच्यासह सर्व नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते .
  या कामासाठी माजी नगराध्यक्षा विद्यमान कर्तव्यदक्ष नगरसेविका सौ राजश्रीताई प्रताप गंगेकर व स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक श्री अक्षय प्रताप गंगेकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन 80 लाख रुपयाचा विकास निधी खेचून आणला ,असून या भूमीपूजनानंतर आता लवकरच हे रस्ते कामासाठी सुरुवात करण्यात येणार आहे.
   कोणतीही निवडणूक असो या रस्त्यामुळे या भागात प्रचार फेरी काढणेही 
मुस्किल होऊन बसले होते, सत्ताधारी नेत्यांना हा रस्ता  करूनच घेणे गरजेचे बनले होते, त्यामुळे गंगेकर कुटुंबातील सर्वांनीच या रस्त्यांसाठी मोठा पाठपुरावा करीत असताना त्यांना नगरसेवक लखनदादा चौगुले यांनीही मोठी साथ देऊन हा प्रश्न मार्गी लागला आहे हे मात्र नक्की