*प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते विजय खरे यांचा सत्कार*

पंढरपूर/प्रतिनीधी
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांचे बंधू विजय खरे यांच्या वाढदिवसानिमित्त आर पी आय (आठवले गट) चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विजय खरे हे पंढरपूर शहर आर पी आय (आठवले गट) चे कार्याध्यक्ष आहेत. यामुळे आपल्या सच्चा कार्यकर्त्याचा सरवदे यांनी आपल्या सोलापूर येथील संपर्क कार्यालयात बोलावून यथोचित सत्कार केला.
यावेळी सोलापूर जिल्हा सरचिटणीस शामसुंदर गायकवाड, तालुका संघटक समाधान बाबर, सोनुदादा शिंदे,लखन वाघमारे,निखिल गायकवाड,अतिश सावंत, यांचेसह पंढरपूर शहर आणि तालुक्यातील आर पी आय चे कार्यकर्ते उपस्थित होते.