*करकंब पोलीस ठाणेचे शनिवार दि. ४ मार्च रोजी नुतन प्रशासकीय इमारत उद्घाटन समारंभ....!*

.
करकंब /प्रतिनिधी
- करकंब पोलीस ठाण्याच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाचा समारंभ शनिवार दिनांक-४ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता राज्याचे महसूल ,पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.
मा.पोलीस अधिक्षक - शिरीश सरदेशपांडे व अपर पोलीस अधिक्षक - हिंमत जाधव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग - विक्रम कदम यांचे अथक परीश्रमाने व मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाणेचे नुतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन संभारभ- दि- 04/03/2023 रोजी सकाळी- 09/00 वा . आयोजित केलेला आहे.
सदरच्या करकंब पोलीस ठाणेचे उद्घाटन समारंभास महाराष्ट्रा शासनाचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री- राधाकृश्ण विखे पाटील, यांचे हस्ते व सोलापुर जिल्हयातील खासदार मा.खा.श्री.श.ब्र.डाॅ.जयसिध्देष्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार-रणजितसिंह नाईक निंबाळकर,खाओमप्रकाष निंबाळकर तसेच सोलापुर जिल्हयातील आमदार आ.रणजितसिंह मोहीते-पाटील, आ.अरुण लाड, आ. जयंत आसगांवकर, आ.सुभाश देषमुख ,आ. बबनराव शिंदे,आ. विजय देशमुख, आ.कु.प्रणिती शिंदे , आ. शहाजी पाटील , आ.राजेंद्र राउत,आ. संजय शिंदे, आ.यशवंत माने ,आ.समाधान आवताडे,आ. सचिन कल्याणशेट्टी, आ.राम सातपुते , माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे प्रमुख उपस्थिती प्रशासकीय व पोलीस सेवेतील सुनिल फुलारी (भा.पो.से.),वि.पो.महा.नि.कोल्हापुर,परीक्षेत्र, मिलींद शंभरकर (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, सोलापुर,जिल्हा,श्री.शिरीष सरदेशपांडे(भा.पो.से.),पोलीस अधिक्षक,सोलापुर ग्रामीण, हिंमत जाधव (म.पो.से.) अपर पोलीस अधिक्षक सो.ग्रा. यांचे प्रमुख उपस्थितीत पार पाडणार आहे.
सदरच्या उद्घाटन समारंभ करीता उपविभागीय पोलीस अधिकारी- विक्रम कदम,पंढरपुर विभाग, करकंब पोलीस ठाणेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक - निलेश तारु व पोउपनि-महेश मुंढे, पोउपनि-अजित मोरे व सर्व पोलीस अंमलदार यांनी करकंब पोलीस ठाणे मधील 27 गावातील सर्व नागरीकांना सदरचा उद्घाटन संभारभ दिनांक - 04/03/2023 रोजी सकाळी 09/00 वा सुमारास उपस्थित राहणेचे आवाहन केले आहे..
.