*महायुतीचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांची वरकुटे गावाला भेट* *ग्रामस्थांच्या मागणीनुसार विकास कामासाठी केले स्वतः अर्थ सहाय्य*

मोहोळ/प्रतिनीधी
वरकुटे ता.मोहोळ गावामध्ये शिवसेना+ भाजपा + रिपाई महायुतीचे मोहोळ विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार श्री. राजू खरे व शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख श्री. चरणराज चवरे यांनी भेट दिली.
श्री. राजू खरे यांच्या स्वखर्चाने वरकुटे गावठाण येथील महादेव मंदिर समोर फ्लेवर ब्लॉक, भुसे वस्ती येथील मारुती मंदिरा समोर फ्लेवर ब्लॉक ,बसाटे वस्ती येथील मारुती मंदिरा समोर फ्लेवर ब्लॉक ,बसविण्यासाठी अर्थसाहाय्य केले.पुढील येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राजयाचे मुखमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. श्री. राजू खरे यांचा सन्मान ग्राम पंचायत सदस्य सतीश बचुटे व चरणराज चवरे यांचा सुभाष सोलंकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपाचे मा.जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आण्णा बचुटे,ग्राम पंचायत सदस्य सुनील सोलंकर, सुदाम बचुटे, आनंद डोंगरे,संतोष बचुटे, चनाप्पा इंगळेश्वर,तात्या शिंदे, सहदेव भोपळे, भाऊसाहेब बचुटे, संतोष भुसे,संदीप बचुटे,राजू बचुटे, मुन्ना बचुटे,शंकर बचुटे, कृष्णा बसाटे,विष्णु पाटील, खंडू लवटे, आबा पाटील, सलगरसर,व वरकुटे मधील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.