*करकंब येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या विद्यमाने दीप नवमी उत्सव संपन्न* *अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दिला संदेश*.

करकंब/ प्रतिनिधी
करकंब येथील रोजा गल्लीतील पुरातन प्रसिद्ध असलेले श्री महादेव मंदिरामध्ये हिंदू संस्कृतीच्या मधील दिव्यांचा उत्सव दीप नवमी याचे औचित्य साधून येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून या दीपोत्सवाच्या माध्यमातून अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा एक नवा संदेश देण्याचा आदर्श निर्माण केला. आपली संस्कृती वेद शास्त्र याची पूर्ण अनुभूती या पुढील वारसांना आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावी या तरुण पिढीमध्ये रुजवावी या उदात्त हेतूने या दिपोत्सव चे आयोजन केले होते.
: या दीपोत्सव प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन माळी करकंब शहरप्रमुख बालाजी पवार तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान राजू अनवते स्नेहदीप व्यवहारे आनंद उंबर दंड रोहित कुंभार रोहन करळे महेश ठोंबरे ज्ञानेश्वर खपाले प्रदीप रेडे व सर्व महाराष्ट्रनवनिर्माण सेनेचे तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.