*प्रा. पंढरीनाथ खाडे यांचे दु:खद निधन*

*प्रा. पंढरीनाथ खाडे यांचे दु:खद निधन*


पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील प्रा. पंढरीनाथ खाडे यांचे सोमवार दि. २५ ऑक्टोबर रोजी रात्रौ १०:३० वाजता पंढरपूर -टेंभूर्णी रस्त्यावर गुरसाळे येथे झालेल्या मोटार सायकल अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी हे त्यांचे मूळ गाव असून श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ते जून २०१८ पासून कार्यरत होते. तीन महिन्यापूर्वी ते येथे बदलून आले होते. प्रा. खाडे यांना महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.  
 प्रा. खाडे यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, आजी व दोन लहान मुली असा परिवार आहे.