*भटुंबरे सोसायटीच्या चेअरमनपदी पंडित शेंबडे यांची निवड* *युवा नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते सर्वच नूतन सदस्यांचा सत्कार*

पंढरपूर,/प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे वि. का. सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी पंडित शेंबडे तर व्हा चेअरमनपदी भीमराव शिंदे यांची बिनविरोध निवड मंगळवारी करण्यात आली. निवडीनंतर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात युवा नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
भारत शेंबडे, शिवाजी सलगर,अर्जुन लोखडे, मोहन खांडेकर, सुरेश शिंदे, तुकाराम शेंबडे ,सुमित पाटील, राजु तावसकर, अलका प्रकाश संगीतराव , सौ. कल्पना दता कांबळे यांची निवड झाल्याने वरील सदस्यांचाही नूतन चेअरमन आणि व्हा चेअरमन सह सन्मान करण्यात आला.
या सोसायटीची निवडणूक स्व सुधाकरपंत परिचारक यांच्या आशिर्वादाने,आ. प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि उमेश परिचारक व प्रणव परिचारक यांच्या सहकार्याने बिनविरोध करण्यात आली. यासाठी गावातील फांचिराम शिंदे, लक्ष्मण खांडेकर, पोपट शिंदे, अनिल पाखरे पाटील, भारत खांडेकर, अंकुश शेम्बडे, नाना खांडेकर, सावता शेम्बडे, नवनाथ खांडेकर, तात्या सलगर, राजेश शेम्बडे, संजय येडगे, बाबा येडगे, नवनाथ येडगे, दत्ता येडगे, बिरुदेव शेम्बडे, निलेश शिंदे, अंकुश शिंदे, दामोदर शिंदे,रामभाऊ शिंदे,सूरज राठी, संजय शिंदे, संतोष शिंदे, भाऊसाहेब गडदे, नानासाहेब जगताप, उत्तम जाधव, सुनील डांगे, बापू शेम्बडे, वासुदेव परचंडे यांच्यासह गावातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.