*सोसायटी प्रमाणेच करकंब ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी-अमोल दादा शेळके* *करकंब नंबर 3 नूतन युवा संचालक यांचा सन्मान व सत्कार....!* *युवा संचालक यांना मिळणार का चेअरमन पदाची संधी....?

*सोसायटी प्रमाणेच करकंब ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी-अमोल दादा शेळके*   *करकंब नंबर 3 नूतन युवा संचालक यांचा सन्मान व सत्कार....!*  *युवा संचालक यांना मिळणार का चेअरमन पदाची संधी....?

करकंब/ प्रतिनिधी:

-ज्याप्रमाणे करकंब नंबर ३ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेची ज्येष्ठ नेते मारुती अण्णा देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसप्पा देशमुख, विरोधी पक्षनेते राहुल काका पूरवत यांनी युवकांना संधी देऊन सोसायटीच्या माध्यमातून सोसायटी बिनविरोध केली.. त्याच प्रमाणे करकंब ही पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने ग्रामपंचायत निवडणुक एकमेकांच्या विचाराने व संवादाने बिनविरोध व्हावी. जेणेकरून अनावश्यक खर्च टाळून गावाचा मोठ्या प्रमाणात विकास करता येईल असे मत अभी छाया प्रतिष्ठान समूहाचे अध्यक्ष अमोल दादा शेळके यांनी व्यक्त केले.
अमोल दादा शेळके मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या करकंब नंबर 3 विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या युवा संचालकांच्या  विशेष सन्मान सोहळा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
सुरुवातीस करकंब नंबर 3 विविध कार्यकारी सोसायटी च्या संचालक पदी युवा संचालक म्हणून रामेश्वर खाडे (वंजारी), व मुलुख मैदानी तोफ शिवाजी सलगर या दोन्ही संचालकांचा विशेष सन्मान व सत्कार अमोल दादा शेळके मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला.
या विशेष सत्कार सन्मान सोहळ्यास जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटरमण  देशमुख,रमेश खारे, फिरोज कोरबू, महेश देशमुख, राजेश खारे, विष्णू देशमुख, बापू शिंदे, दिलीप शेटे वैभव जाधव आदीसह अमोल दादा मित्र परिवाराचे सर्व सहकारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून युवकांना संचालक पदाची जशी संधी निर्माण करून दिली त्याच पद्धतीने या सोसायटीच्या माध्यमातून युवकांना चेअरमनपदाची संधी देऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयाच्या बाबतीत काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा युवा संचालक मुलुख मैदानी तोफ शिवाजी सलगर यांनी व्यक्त करून सर्वांचे सोसायटी बिनविरोध झाल्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले.