*राष्ट्रवादीचे नेते नागेशदादा फाटे यांच्या हस्ते पुणे येथे उद्घाटन* *सिद्धिका सक्षम बहुउद्देशीय संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न* ..   

*राष्ट्रवादीचे नेते नागेशदादा फाटे यांच्या हस्ते पुणे येथे उद्घाटन*  *सिद्धिका सक्षम बहुउद्देशीय संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न* ..   

पंढरपूर/प्रतिनिधी 

    आज *मोशी ( पुणे )येथे सिद्धीका सक्षम बहुउद्देशीय संस्थेचा उद्घाटन समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशअध्यक्ष मा . श्री नागेशदादा फाटे यांचे शुभ हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट व पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी मायाताई बारणे , उद्योग व व्यापार विभाग पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला अध्यक्षा मोनिकाताई जाधव यांचे उपस्थितीत संपन्न झाला* . 
यावेळी प्रदेश अध्यक्ष श्री नागेश फाटे यांनी संस्थेचे अध्यक्षा ज्योती मधुरकर सह त्यांच्या टीमने जे कार्य हाती घेतले आहे खूपच सर्वसामान्य जनतेच्या हिताचे असून यामुळे शासकीय सर्व योजना विद्यार्थ्यांना मदत या संस्थेमार्फत केली जाणार आहे हे खूप  अभिमानाची गोष्ट आहे या अगोदरही त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग नोंदवून पक्ष हिताचे कार्य केले आहे त्यांच्या या संस्थेस उद्योग व व्यापार विभाग मार्फत सहकार्य केले जाईल व संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .
 यावेळी महिला पिंपरी चिंचवड शहर जिल्हा शहराध्यक्षा कविताताई आल्हाट व उद्योग व्यापार महिला अध्यक्षा मोनिकाताई जाधव यांनीही सिद्धीका संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या .
यावेळी उद्योजक श्री संजय पवार, उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव श्री कल्याण कुसूमडे ,प्रदेश सदस्य श्री श्रीकांत पवार ,पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री .श्रीकांत कदम, श्री हनुमंत बागल,श्री .संतोष जाधव,सिद्धीका संस्थेचे उपाध्यक्ष श्री रवींद्र कुदळे ,सचिव कु .अक्षया थोरात ,खजिनदार दीपिका इथापे, सेक्रेटरी स्वाती पांचाळ, संघटक श्री कैलास पाटील,सभासद श्वेता काणेकर,लक्ष्मी भोरे ,स्वाती भोरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .