* *सरपंच मळ्यात.... डेंगू मलेरिया चे रुग्ण खाजगी रुग्णालयात......*.!  *ग्रामविकास अधिकाऱ्यांना काय करावे सुचेना* *डेंगू मलेरिया व साथीच्या रोगाचे थैमान*

* *सरपंच मळ्यात.... डेंगू मलेरिया चे रुग्ण खाजगी रुग्णालयात......*.!  *ग्रामविकास अधिकाऱ्यांना काय करावे सुचेना* *डेंगू मलेरिया व साथीच्या रोगाचे थैमान*


करकंब/ प्रतिनिधी

: करकंब ही पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी 17 सदस्य संख्या असलेली ग्रामपंचायत असून या करकंब गावची लोकसंख्या सुमारे पंचवीस ते तीस हजारांवर गेली आहे. गेली सहा महिने ग्रामपंचायत चा कार्यभार सुरू असून या ग्रामपंचायतच्या ग्राम विकास अधिकारी पदी पंढरपूर तालुक्यात नावाजलेले कर्तव्यदक्ष असे ग्राम विकास अधिकारी म्हणून डॉक्टर सतीश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. कोरोना चे सावट असताना गावामध्ये डेंगू मलेरिया साथीचे रोग याने फैलाव घातला आहे अशा परिस्थितीत कर्तव्यदक्ष असलेल्या ग्राम विकास अधिकारी यांनी वेळीच योग्य भूमिका घेतली नसल्यामुळे आज करकंब गावात डेंगू मलेरिया ने थैमान घातले आहे. करकंब गावात ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर गल्लोगल्ली अस्वच्छता घाणीचे साम्राज्य दुर्गंधी अशा मुळे नागरी वस्ती मधील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खाजगी हॉस्पिटल, मध्ये असंख्य रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत असून करकंब येथील अनेक खाजगी रुग्णालयात डेंगू ,डेंगू सदृश्य  व मलेरियाच्या ,साथीच्या रोगाने रुग्णाने गच्च भरली आहेत .याचा आर्थिक व मानसिक त्रास हा फक्त अशा कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे होत असल्याचे सामान्य नागरिकांतून बोलले जात आहे.


  डेंगू मलेरिया ची साथ ही गावातच नाही तर वाड्या वस्ती वर ही पोहोचलेली आहे. अशावेळी ग्राम विकास अधिकाऱ्यांनी कोणतीही तातडीची मासिक मीटिंग घेऊन ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक वार्ड मध्ये गल्लोगल्ली असलेली अस्वच्छता घाणीची दुर्गंधी दररोज औषध फवारणी तसेच नागरिकांच्या आरोग्याची काळजी बाबत पूर्णता निष्काळजीपणा दाखवल्यामुळे ग्रामस्थांमधून संतापाची लाट उसळली आहे. नियुक्ती झाल्यापासून ग्राम विकास अधिकारी हे फक्त केंद्र सरकार व राज्य सरकार कडून थेट ग्रामपंचायत कडे येणाऱ्या निधीकडे व ग्रामपंचायत च्या विविध मार्गाने आलेल्या निधीवर डोळा ठेवून असल्याचे बोलले जात आहे. पण नागरिकांच्या आरोग्याचे काय असा प्रश्नही सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे. करकंब गावची आरोग्य समिती ही फक्त कागदावर असून लोकांच्या आरोग्याच्या हिताची काळजी व त्याबाबत संबंधितांना जाब विचारण्याचे धाडस अद्याप या समितीत राहिले नाही. त्यामुळे लोकांना नाहक पणे खाजगी उपचारासाठी करकंब पंढरपूर टेंभुर्णी अकलूज सोलापूर विविध ठिकाणी खाजगी हॉस्पिटलमध्ये जावे लागत आहे. ही करकंब गावाच्या दृष्टीने शरमेची बाब असल्याचे महिला वर्गातून बोलले जात आहे.


   करकंब गावात डेंगू मलेरिया डेंगू सदृश्य आजाराची साथ असताना ग्रामविकास अधिकाऱ्यांना काय सुचेना,रोग म्हशीला आणि इंजेक्शन पखाली ला अशी अवस्था ग्राम विकास अधिकारी यांची झाली आहे. पंचायत समिती स्तरावरून त्यांनी त्वरित गेल्या दोन महिन्यापूर्वीच करकंबकरांच्या आरोग्याच्या हिताची काळजी घेऊन निष्काळजीपणा न दाखवता ही बाब गटविकास अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्यायला हवी होती . मासिक सभा कधी होते, तसेच अजून ग्रामसभा घेण्यात आली नाही अशीही चर्चा सुरू आहे.
करकंब गावात डेंगू मलेरिया डेंगू सदृश्य साथीच्या आजाराचे मोठ्या प्रमाणात लागन असतानाही ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्यापासून ग्रामपंचायत सदस्य वॉर्डातून गायब झाले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.
 ग्राम विकास अधिकारी जसे टक्केवारीच्या निधीसाठी प्रचंड मेहनत व धडपड करतात तशीच मेहनत आणि धडपड जर करकंब करांच्या आरोग्यासाठी दाखवली असती तर सामान्य लोकांनी समाधान व्यक्त केले असते

गावात डेंगू मलेरिया डेंगू सदृष्य आजाराची मोठ्या प्रमाणात लागण असताना गेल्या दोन महिन्यापासून केवळ ग्रामपंचायत च्या नाकर्तेपणामुळे व ग्रामसेवकाच्या निष्काळजीपणामुळे सामान्य लोकांच्या आरोग्य ही खेळत आहेत. त्यामुळेच सामान्य लोकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.कुठल्याही प्रकारचा सर्वे केला नाही त्याची नोंद अद्याप ग्रामपंचायत कडे नाही.
                   चौकट
करकंब गावातील डेंगू मलेरिया व डेंग्यू सदृश्य तसेच साथीच्या रोगाबाबत सरपंच ग्राम विकास अधिकारी यांनी आम्हास तालुका वैद्यकीय अधिकारी यांना याबाबत माहिती दिली नाही.

:       श्री प्रशांत काळे. गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर