*जयंत दर्शने ह्यांचे दुःखद निधन*

*जयंत दर्शने ह्यांचे दुःखद निधन*

पंढरपूर/प्रतिनीधी 

महाराष्ट्र रिजन बडोदा बँक कर्मचारी संघटनेचे भूतपूर्व महासचिव जयंत गंगाधर दर्शने, पंढरपूर (वय ६८) ह्यांचे आज दुपारी पुणे येथे खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

राज्य संघटनेचे महासचिव नात्याने त्यांनी पुणे,सांगली कोल्हापूर, गोवा,नागपूर, औरंगाबाद विभागात आपल्या मैत्रीपूर्ण स्वभावाने तितक्याच आग्रही विषय मांडणीमुळे लोकप्रियता मिळवली होती.

बडोदा बँक पंढरपूर शाखेचे जयंत दर्शने हे ग्राहकांच्यासाठी विश्वासक दुवा होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे.