*नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रांताधिकार्‍यांना धरले धारेवर*. *रि.पा.ई चे दिपक चंदनशिवे यांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार;* आंदोलनाचा ईशारा*

*नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रांताधिकार्‍यांना धरले धारेवर*.  *रि.पा.ई चे दिपक चंदनशिवे यांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार;* आंदोलनाचा ईशारा*

पंढरपूर / प्रतिनिधी 

मंगळवेढा,सांगोला विभागातील नागरिकांच्या तक्रारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश संघटन सचिव दीपक चंदनशिवे यांच्याकडे आल्याने मंगळवेढ्याचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर त्यांच्या विरोधात मनमानी कारभार, भ्रष्टाचार व बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करून निलंबित करा अशी मागणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे करुन सामान्य नागरिकांच्या तक्रारी वरुन थेट प्रांताधिका-यालाच धारेवर धरण्यात आले आहे.

मंगळवेढा, सांगोला विभागातील नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दीपक चंदनशिवे यांच्याकडे आलेल्या तक्रारी वरुन येथील उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच भ्रष्टाचार व त्यांच्या बेकायदेशीर मालमत्तेची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दीपक चंदनशिवे यांनी केली आहे.
या तक्रारी मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की उपविभागीय अधिकारी हे रुजू झाल्यापासून बिगर शेती प्रकरणे निर्णय न देता प्रलंबित ठेवणे व मार्गी लावण्यासाठी पैशाची मागणी करणे,आर.टी.एस अपिलाचे निकाल प्रलंबित ठेवणे, सोलापूर-रत्नागिरी हायवे मध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी अडवणूक करणे, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य नागरिक, महिला कामानिमित्त भेटण्यासाठी गेले असता त्यांना उध्दटपणे बोलणे,नागरिकांना अपमानीत करणे, असभ्य वर्तन करणे, अश्लिल भाषेत बोलणे, कामासाठी हेलपाटे मारण्यास लावणे, पैशाची मागणी करुन 'लाखो  रुपये देऊन मी खुर्चीवर बसलो आहे. त्यामुळे माझे कुणी काही वाकडे करू शकत नाही'अशी भाषा वापरत आसल्याचा थेट आरोप आर.पी आय कडून करण्यात आले आहे. याबाबत त्यांची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे  करण्यात आली आहे.
याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास १२ जानेवारी २०२२ रोजी मंगळवेढा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्याचा इशारा आर.पी.आयचे दिपक चंदनशिवे यांना दिला आहे.
यावेळी माऊली हळणवर, भारत शिंदे, विनोद उबाळे,सुशिल उबाळे, अनिल कसबे, विजय कसबे, गणेश राठोड, रवि भोसले, विजयकुमार खरे, समाधान बाबर, राजकुमार भोपळे, दत्ता वाघमारे, महादेव सोनवणे, सुरेश नवले, अमोल कांबळे, प्रशांत कांबळे, निलेश उबाळे, सुरज उबाळे, अविंदा गायकवाड, वैशाली माने, माया खरे, रुपाली कसबे आदि उपस्थित होते.