*करकंब येथे डॉ. देवकते बाल रुग्णालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न....!* *करकंब येथे प्रथमच बाल रुग्णालयासाठी अद्ययावत सोई सुविधा उपलब्ध होणार*

.
करकंब/ प्रतिनिधी
: येथे नुकतेच पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले बाल रोग तज्ञ डॉक्टर देवकते यांच्या डॉ. देवकते बाल रुग्णालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या डॉक्टर देवकते बाल रुग्णालयाचे उद्घाटन नरसप्पा देशमुख जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस ,जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, सागर चवरे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, माजी सरपंच मारुती अण्णा देशमुख, डॉक्टर प्रभा साखरे वैद्यकीय अधिकारी , डॉक्टर पल्लवी देशमुख , डॉक्टर धीरज पुरवत ,माजी जि प सदस्य बाळासाहेब देशमुख, प्राध्यापक प्रदीप पाटील सर, माजी सरपंच दिलीप नाना पुरवत, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंगटे, माजी महिला बालकल्याण सभापती रजनीताई देशमुख ,विरोधी पक्ष नेते राहुल काका पुरवत, माजी जि प उपाध्यक्ष बाबुराव जाधव, युवा नेते अभिषेक पूरवत, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब व्यवहारे, प्राध्यापक सतीश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे, अशोक जाधव ,नागनाथ गायकवाड ,बाळासाहेब हराळे, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश आप्पा माने, विवेक शिंगटे, अदि मान्यवरांसह करकंब व परिसरातील सर्व वैद्यकीय डॉक्टर ,ग्रामस्थ , व विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी करकंब येथे डॉक्टर श्रीकांत देवकते यांच्या बाल रुग्ण सेवेच्या रुग्ण सेवेबद्दल मनोगत व्यक्त करून उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी सुप्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉक्टर श्रीकांत देवकते यांनी या बांधवांना सेवेच्या संदर्भात आपला उद्देश उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ यांना सांगितला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव चव्हाण , प्रास्ताविक अविनाश देवकते यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार डॉक्टर ओजेस देवकते यांनी मानले.