*तावशी गावाच्या विकासासाठी सर्वोतपरी मदत करणार - आ. समाधान आवताडे*

पंढरपूर- / प्रतिनिध
तावशी गावच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार असे मत आमदार समाधान ( दादा ) आवताडे यांनी महादेव मंदिरामध्ये नविन पिंड प्रतिष्ठापनेच्या प्रसंगी बोलतान व्यक्त केले.तावशी येथील शंभर वर्षापूर्वीचे मंदिर असून यामध्ये श्रावण मासातील शुभ दिवस सोमवार या दिवशी या मंदिरामध्ये नवीन पिंड प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे कार्यकुशलता आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते या नवीन पिंडी चा अभिषेक घालून पूजा करण्यात आली.यावेळी मठाधिपती यांच्या हस्ते आमदार समाधान दादा आवताडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास रेणुकाचार्य मंद्रूपकर महाराज उपस्थित होते. त्यांचेसोबत गौरीशंकर बुरकुल, बाळासो (काका ) यादव , सुभाष (आण्णा ) यादव, भुजंगराव यादव, पुरुषोतम पवार - पाटील, पांडूरंग (आबा ) आसबे, भारत रणदिवे, शिवाजी (तात्या ) शिंदे, अल्लाउदीन मुलाणी, किसन आसबे, सरकार राजे यादव पाटील, रामभाऊ आसबे, साहेबराव सातपुते, तात्यासाहेब यादव, दिलिप पावले, सतिश कोपे, शेखर कोपे, अभिजित शिंदे व आमदार समाधान दादा आवताडे यांचे स्वीय सहाय्यक मा. बालम मुलाणी साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.