*सोलापूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर- जिल्हा बैठक संपन्न.*

करकंब/ प्रतिनिधी :-
राष्ट्रीय चर्मकार महासंघ सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व समाजबांधवाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षी दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी, समाजातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा गौरव, तसेच समाजामध्ये विशेष असे कार्य केलेल्या पाच समाजबांधवाचा समाज भूषण पुरस्कार देऊन विशेष असा सन्मान करण्यात येणार आहे.
कोरोना काळामध्ये समाजातील गोरगरीब लोकांना ज्या व्यक्तीने अन्नधान्य देऊन मदत केलेली आहे अशा व्यक्तींचा सुद्धा यामध्ये सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळच्या वतीने गरजू लोकांना कर्जाचे चेकचे वाटप करण्यात येणार आहे.
या बैठकीला राष्ट्रीय चर्मकार महासंघ सोलापूर शहर जिल्ह्यातील पदाधिकारी चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.