*उच्चांकी लसीकरणाबद्दल वैदकिय अधीक्षक व आशा स्वयंसेविका यांचा सन्मान*.

करकंब, तालुका पंढरपूर येथे आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करकंब ग्रामीण रुग्णालय येथे एकाच दिवसात ८५५ लसीकरणाचा उच्चांक केल्याबद्दल ग्रामपंचायत विरोधी पक्षनेते व ग्रामपंचायत सदस्य राहुल काका पुरवत यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयातील सर्व स्टाफचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तुषार सरवदे व त्यांचा सर्व स्टाफ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संबंधित सर्व आशाताईंचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य मारुती अण्णा देशमुख, ग्रामपंचायत सदस्य बापू शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संतोष धोत्रे, नागेश गायकवाड, मुस्ताक बागवान, लक्ष्मण नलावडे, एडवोकेट अक्षय शिंदे, पत्रकार मनोज पवार, विश्वनाथ केमकर सर, इत्यादी उपस्थित होते