*भाळवणी येथे कर्करोग तपासणी शिबिर संपन्न* *शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी  बाबर यांच्या हस्ते उद्घाटन* *अनेक माता भगिनींनी घेतला  लाभ*

*भाळवणी येथे कर्करोग तपासणी शिबिर संपन्न*  *शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी  बाबर यांच्या हस्ते उद्घाटन*  *अनेक माता भगिनींनी घेतला  लाभ*

पंढरपूर/प्रतिनिधी 

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे  प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गुरुवारी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजी बाबर यांचे हस्ते करण्यात आले.

 

    भाळवणी येथे आयोजित करण्यात आलेले  कर्करोग तपासणी शिबिर हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात आले आहे. सदरचे शिबिर राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत राबविले जात असल्याने याचा ग्रामीण भागातील नागरिकांना उपयोग होत आहे. सदरचे शिबिरासाठी मोबाईल व्हॅनचा वापर केला जात आहे. यामुळे तपासणीसाठी याचा फिरते हॉस्पिटल म्हणून उपयोग होताना दिसत आहे.
     या शिबिराचे वेळी डॉ भातलवंडे, भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्तव्यदक्ष  आरोग्य अधिकारी डॉ. निशा रोकडे, डॉ माळी, उसरपंच नितीन शिंदे, पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवान चौगुले यांचे भाळवणी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.