*पंढरीत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन* *मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती*

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी मोठ्या थाटात पार पडला. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक अनिल सावंत, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, यश नागेश भोसले, श्रीनिवास बोरगावकर आदी प्रमुख उपस्थित होते.
येथील वीर सावरकर क्रिकेट क्लब आणि एनआयटी ग्रुपचे प्रमुख श्याम गोगाव यांच्या वतीने, क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा , बुधवारी सकाळी पार पडला . मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी या स्पर्धेचे उद्घाटन करून , स्पर्धेस हिरवा कंदील दाखविला.
पंढरपूर शहरातील मान्यवर नेते गण , पंढरपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मनसे नेते दिलीप धोत्रे तसेच नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धा भरवण्यात आल्या असल्याची माहिती आयोजक श्याम गोगाव यांनी याप्रसंगी दिली. बुधवार दि. २५ ऑगस्ट पासून येथील रेल्वे मैदानावर सुरुवात झालेल्या या क्रिकेट स्पर्धेत राज्यातील सांगली, सातारा , इंदापूर , सांगोला, सोलापूर , बार्शी यासह मराठवाड्यातील क्रिकेट संघ सहभागी झाले असल्याची माहिती यावेळी गोगाव यांनी दिली. या स्पर्धेतील पहिला सामना मनसे नेते दिलीप धोत्रे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत खेळविण्यात आला.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील , बाळासाहेब सूर्यवंशी , अमोल आटकळे, तेजस गांजले , गणेश पिंपळनेरकर ,महेश पवार, पत्रकार अभिराज उबाळे, अविनाश साळुंखे , महालिंग दुधाळे यांच्यासह, शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
चौकट
पंढरपूर शहरातील वीर सावरकर क्रिकेट क्लब तसेच एनआयटी ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या , क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या शुभहस्ते बुधवारी करण्यात आले . पंढरपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मनसे नेते दिलीप धोत्रे तसेच नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या या उद्घाटन समारंभास शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.