*गादेगावचे अनिकेत शिंदे यांचा राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते सन्मान*! *राज्य लोकसेवा परीक्षेत सहाय्यक निंबधक सहकारी संस्था साठी झाली आहे निवड*

*गादेगावचे अनिकेत शिंदे यांचा राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते सन्मान*!  *राज्य लोकसेवा परीक्षेत सहाय्यक निंबधक सहकारी संस्था साठी झाली आहे निवड*

*गादेगावचे अनिकेत शिंदे यांचा राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते सन्मान*!

*राज्य लोकसेवा परीक्षेत सहाय्यक निंबधक सहकारी संस्था साठी झाली आहे निवड

पंढरपूर/प्रतिनिधी

 पंढरपूर तालुक्यातील  गादेगावचे अनिकेत शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष  नागेश फाटे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

 अनिकेत नंदकुमार शिंदे हे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था  ( राजपत्रित )या पदावर त्यांना स्थान मिळाले आहे. म्हणून सन्मान करण्यात आला. गादेगाव सारख्या ग्रामीण भागातून कुठलाही क्लास न लावता ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले त्याबद्दल गादेगाव पंचक्रोशीतून व पंढरपूर तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे .
 आज समाजात अशी परिस्थिती आहे की पुणे , मुंबई , दिल्ली सारख्या शहरात जाऊन मोठमोठे क्लास जॉईन करून पालक व विद्यार्थी खर्च करून एम पी एस सी व यु पी एस सी परीक्षा देत आहेत परंतु काही प्रमाणातच विद्यार्थी उत्तीर्ण होत असतात परंतु अनिकेत शिंदे हा चोवीस वर्षाचा युवक गेल्या दोन वर्षात आपल्या घरीच अभ्यास करून पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाला आहे .
  यावेळी  पालकांनी बोलताना माझा मुलगा व्हाट्सअप फेसबूक  वापरत नव्हता माझ्या घरात टीव्ही नाही सोशल मीडिया पासून दूर राहिल्यामुळे मुले चांगलं यश संपादन करू शकतात असे नंदकुमार शिंदे यांनी आपल्या अनुभवातून सांगितले हाआदर्श समाजातील इतर तरुणांनी घ्यावा असे अहवान त्यांनी केले .
यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस श्री हनुमंतराव मोरे, सलीम सय्यद नूर काझी , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे, सतीश बागल , विनय शिंदे  ,विकास घाडगे  , सोमनाथ सातपुते उपस्थित होते .