*राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कारांमध्ये सिद्धेवाडीचे डॉ विठ्ठल जाधव* *राज्यातील विविध क्षेत्रातील ६०जणांना देण्यात येणार पुरस्कार* *२४डिसेंबर रोजी सोलापूर येथे होणार मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण

*राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कारांमध्ये सिद्धेवाडीचे डॉ विठ्ठल जाधव*  *राज्यातील विविध क्षेत्रातील ६०जणांना देण्यात येणार पुरस्कार*  *२४डिसेंबर रोजी सोलापूर येथे होणार मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण

पंढरपूर/प्रतिनीधी 

स्वर्गीय हरिचंद्र फाउंडेशन च्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील डॉ विठ्ठल जाधव यांनीही केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

        2023मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील ६० मान्यवरांना रविवार दिनांक २४ डिसेंबर 2023 रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर, येथे गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती स्वर्गीय हरिचंद्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णात गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पुरस्काराचे मानकरी मधून सिद्धेवाडी चे डॉक्टर विठ्ठल शिवाजी जाधव यांना यावर्षीचा कोविड काळातील घरोघरी जाऊन कोविड रुग्णांची सेवा केली .त्यांच्या हातून १६ ते १७खेड्यातील सिद्धेवाडी च्या आजूबाजूच्या परिसरातील बऱ्याच लोकांचे जीव वाचवण्यात यशस्वी झाले, आज त्यांना हा पुरस्कार मोठ्या थाटामाटात प्रदान करण्यात येणार आहे,