*महाशिवरात्री दिवशी मोफत संपूर्ण दिवसभर चहा वाटप.* *आठ वर्षापासून जपली परंपरा*. *वेगवेगळे उपक्रम राबवणारे गाव म्हणून "भोसे" गाव राज्यात ठरतेय आयडॉल....!

करकंब /प्रतिनिधी :
नेहमीच वेगळे- वेगळे उपक्रम कायमस्वरूपी राबवणारे गाव म्हणून भोसे (ता. पंढरपूर) या गावाची ओळख आहे. कोणत्याही जातीधर्माची बंधने न पाळता सगळ्या धर्माचे सण समारंभ मोठ्या उत्साहात आणि सर्व ग्रामस्थ एकत्र येत पार पडणारे हे गाव. हेच "भोसे "गाव सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात एक आदर्शवत आणि "आयडॉल"म्हणून पाहिलं जातंय. याची चर्चा संपूर्ण राज्यात होत असते. याच गावात गेल्या आठ वर्षापासून इरफान हॉटेलचे मालक - इरफान मुलाणी हे गावातील तसेच परिसरातील लोकांना दिवसभर मोफत चहाचे वाटप करीत "सामाजिक बांधिलकी" जपत आहेत.
आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने इरफान मुलाणी यांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी त्यांचा फेटा बांधून सत्कार केला. यावेळी पै. भारत मस्के, तलाठी भरू गोरे, बशीर मुलाणी, महादेव गावंधरे, बाळू गावडे, मधुकर कुंभार, समाधान कोरके, विष्णुपंत गावंधरे, जयवंत भाकरे, पपू कोरके, रामा वाघमोडे, तानाजी देशमुख, धनंजय तळेकर, लारा श्रीखंडे आदी उपस्थित होते.