सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे विरुद्ध आर आर सी च्या कारवाईसाठी प्रादेशिक सह (साखर) यांच्याकडे केली मागणी ! याच कारखान्याचे संचालक दीपक पवार हे ऊस उत्पादकांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी चेअरमन काळे यांच्या विरुध्द आतापासूनच मैदानात

सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे विरुद्ध आर आर सी च्या कारवाईसाठी प्रादेशिक सह (साखर) यांच्याकडे केली मागणी !  याच कारखान्याचे संचालक दीपक पवार हे ऊस उत्पादकांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी चेअरमन काळे यांच्या विरुध्द आतापासूनच मैदानात


पंढरपूर :-प्रतिनिधी

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह  साखर कारखाना लि भाळवणी या  कारखान्यामध्ये अनेक शेतकरी यांनी ऊस गळीतास देऊनही  अनेकजनाची ऊस बिलाची रक्कम एफआरपी प्रमाणे अदा करण्यात आली नाहीत, तरी या करखान्याविरुद्ध आर आर सी प्रमाणे कारवाई करून शेतकऱ्याची देणी चुकती करावीत या मागणीसाठी याच कारखान्याचे माजी संचालक आणि चेअरमन काळे यांचे जवळचेच नातेवाईक दीपक पवार यांनी काल शुक्रवार दि11 जून रोजी प्रादेशिक सह संचालक(साखर) यांच्याकडे लेखी तक्रारी वजा निवेदन दिले आहे. यामुळे दीपक पवार आणि चेअरमन कल्याणराव काळे यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा उफाळला असल्याचे दिसून येत आहे

.
     या कारखान्यास सन 2018-19 आणि2020 -21 या दोन्ही गाळप हंगामामध्ये  या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप करण्यासाठी दिला होता. परंतु नियमानुसार या कारखान्याने एफआरपी प्रमाणे रक्कम अद्यापही जमा केली नसून ती अद्याप का करण्यात आली नाही, यामुळे या करखाण्याविरुद्ध वरीलप्रमाणे का कारवाई होऊ शकली नाही असा प्रश्नही या देण्यात आलेल्या निवेदनात विचारला आहे.
    या निवेदन देण्यात आल्यापासून काही दिवसात जर आपणाकडून कारवाई करण्यास कुचराई दाखविली तर पुढील कालावधीत शेतकरी वर्गाच्या रोषास सामोरे जावे लागेल असा इशाराही ऍड दीपक पवार यांनी तक्रारी निवेदनात दिला आहे.