*प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा  :-सुशील बेल्हेकर*

*प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा  :-सुशील बेल्हेकर*

करकंब:- प्रतिनिध

ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत याचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करून लक्षणे दिसताच तपासणी करून घेणे गरजेचे आहे तपासणीसाठी नागरिकांनी चालढकल केल्यास त्याचा परिणाम स्वतःचे कुटुंब आणि इतर समाजावर होऊ शकतो परिणामी प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा असल्याचे मत तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी व्यक्त केले

कोरोनाची दुसरी लाट तीव्र असताना  भोसे (ता. पंढरपूर) हे गाव मागील काही दिवसात कोरोना मुक्त झाले होते परंतु गावात पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागले असल्याचा पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कोरोना ग्रामस्तरिय आढावा बैठकीत बेल्हेकर बोलत होते. यावेळी सरपंच गणेश पाटील, मंडल अधिकारी बी. सी. औसेकर, तलाठी श्री. कोळी, ग्रामविकास अधिकारी डी. बी. भुजबळ उपस्थित होते.

यावेळी आढावा घेताना सरपंच गणेश पाटील म्हणाले की, कोरोनाचा ग्रामीण भागातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवारी (दि. 5) आम्ही किमान पाचशे ग्रामस्थांच्या कोरोना चाचणी करण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये सर्वप्रथम मी स्वतः तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदार, प्राथमिक शिक्षक यांच्यासह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील ग्रामस्थांच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

तहसीलदार बेलेकर म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून आपण कोरोनाशी मुकाबला करत आहोत परिणामी आर्थिक व्यवस्था डबघाईला आलेली आहे, त्यामुळे यापुढे लॉकडाऊन किंवा गावे बंद न करता कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या वाढविण्यात येणार आहेत, यासाठी प्राथमिक शिक्षकांनी तसेच तलाठी, ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांना कोरोना चाचणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. 

यावेळी डॉ. अनिरुद्ध नाईकनवरे, पोलीस पाटील श्री. पाटील, आरोग्य सेविका रूपाली सुतार, बाळासाहेब पवार, अंकुश जमदाडे, किसन नाईकनवरे, भगवान अडगळे यांच्यासह कोरोना समितीतील सदस्य उपस्थित होते. 

फोटो ओळी: भोसे (ता. पंढरपूर) येथे कोरोना समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, सरपंच गणेश पाटील.