.*लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे यांच्या निधीतून दीड कोटी रुपये मंजूर* : *आ. बबनदादा शिंदे यांच्या विशेष फंडातून रस्त्याचे काम सुरु......!*

करकंब/ प्रतिनिधी
येथील अजितसिंह देशमुख मित्र मंडळाच्या वतीने करकंब येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय तसेच माढा विधानसभेचे लोकप्रिय आमदार बबन दादा शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच
शिव मल्हार न्यूज पोर्टल व वृत्तपत्रांच्या माध्यमातून या रस्त्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे करकंब नवरा- नवरी ते मोडनिंब रस्त्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून सध्या या रस्त्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. गेले अनेक अनेक वर्षापासून हा रस्ता दुर्लक्षित होता .सोलापूरला जाण्यासाठी करकंब येथून याच रस्त्याने मोठी वाहतूक असून वाईट अवस्थेतून लोकांना जावे लागत होते . जिवंतपणीच मरण यातना सोसाव्या लागत होत्या. परंतु गेली कित्येक वर्षे हा रस्ता दुर्लक्षित राहिलेला होता
अजित्सिंह देशमुख यांनी वारंवार आमदार बबनदादा शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. त्याचे काम दर्जेदार व्हावे .अशी मागणी नुकतीच सार्वजनिक बांधकाम अभियंता डीवाय पाटील यांच्याकडे अजित्सिंह देशमुख मित्र मंडळाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग करकंब यांच्याकडे मागणी केली आहे .
यावेळी अशोक देशमुख रामचंद्र सलगर महेश गुजरे मिथुन चंदनशिवे सर अर्जुन मामा शेटे संतोष शिंदे नितीन दुधाळ शैलेश जवारे सचिन चेडे विष्णू चेडे सुधीर मगदूम आयाज बागवान इत्यादी यावेळी करकंब येथील नागरिक उपस्थित होते.