दामाजी कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व।कि।रा।मर्दा यांची पुण्यतिथी कारखाना कार्यस्थळावर संपन्
श्री संत दामाजी सह।साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व।कि।रा।मर्दा उर्फ मारवाडी वकीलसाहेब यांची १३ वी पुण्यतिथी शनिवार दि।२९/५/२०२१ रोजी कारखाना कार्यस्थळावर त्यांचे पूर्णाकृती पुतळयास आदरांजली वाहून साजरी करणेत आली।
यानिमित्त कारखाना कार्यस्थळावर मार्वेŠट कमीटीचे सभापती मा।श्री। सोमनाथ आवताडे, कारखान्याचे संचालक मा।श्री। लक्ष्मण एकनाथ जगताप, मा।श्री। राजेंद्र दामोदर सुरवसे, मा।श्री। सुरेश बापू भाकरे, मा।श्री। महादेव अर्जुन लवटे यांचेसह मा।श्री। भारत निकम ,कार्यकारी संचालक श्री।झुंजार आसबे यांचे प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व।कि।रा।मर्दा उर्फ मारवाडी वकीलसाहेब व संस्थापक व्हा।चेअरमन स्व।रतनचंद शहा (शेठजी) यांचे कारखाना कार्यस्थळावरील पूर्णाकृती पुतळयास पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली।
यावेळी कारखान्याच्या निरनिराळया विभागातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना शाल, श्रीफळ तसेच संपूर्ण कपडे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सùनिटायझर व मास्क देवून वरील मान्यवरांचे हस्ते यथोचित सत्कार करŠन त्यांच्या भावी आयुष्यास सुयश चिंतीले।
कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेता सदर कार्यक्रम सोशल डिस्टन्सीगचे पालन करुन साध्या पध्दतीने पार पाडला। कामगार पतसंस्थेचे माजी चेअरमन व सेवानिवृत्त कर्मचारी श्री।प्रकाश पाटील व कामगार संघटनेचे अध्यक्ष विठठल गायकवाड यांनी यावेळी मारवाडी वकिलसाहेब यांचे आठवणीना उजाळा दिला व वारंवार दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत असलेला कारखाना विद्यमान चेअरमन आमदार श्री।समाधानदादा आवताडे यांनी उत्तम नियोजन व काटकसर करुन चांगल्या प्रकारे चालविलेबध्द्ल अभिनंदन केले। यावेळी कारखान्याचे चिफ अकौंटंट श्री।रमेश गणेशकर, शेती अधिकारी श्री।रमेश पवार, स्टोअर किपर श्री।उत्तम भुसे,लेबर आùफीसर श्री।आप्पासाहेब शिनगारे, सुरक्षा अधिकारी श्री।लक्ष्मण बेदरे, कार्यालय अधिक्षक दगडु फटे, पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी, विभागप्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते।