*करकंब येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक करकंब यांनी आजादी का अमृत महोत्सव अनोख्या पद्धतीने केला साजरा*.*करकंब च्या विदर्भ कोकण बँकेने दिले 28 महिला स्वयंसहाय्यता गटाला 28 लाखाचे कर्ज मंजुरीचे पत्र * *विविध स्पर्धा , महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद* .
करकंब /प्रतिनिधी
येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा करकंब यांच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव नुकताच बुधवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक निधी अंतर्गत विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा करकंब व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) तालुका पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी काअमृत महोत्सव निमित्त डिजिटल साक्षरता महिला मेळावा घेण्यात आला.उमेद अभियानातील 13 महिला बचत गटांनी रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आजादी काअमृत महोत्सव या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत चाळीस महिलांनी सहभाग नोंदविला. व या स्पर्धेतून प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस या बँकेत च्या वतीने विजेत्या स्पर्धकांना देण्यात आली. तर रांगोळी स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक बचत गटाला पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी क्षेत्रीय कार्यालय सोलापूर येथील वित्तीय समावेशन अधिकारी सत्यप्रकाश मेहता यांनी आजादी का अमृत महोत्सव आणि बँक याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. शाखा व्यवस्थापक कल्पेश शिरसागर यांनी विमा व पेन्शन बाबत विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे महिला व बालकल्याण च्या माजी सभापती व जि प सदस्य रजनी देशमुख यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रभाग समन्वयक अभिजीत अंगरखे यांनी सर्व स्वयंसहाय्यता गटातील महिलांना दशसुत्री बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे विशेष लक्ष वेधले ते करकंब येथील 28 महिला स्वयंसहाय्यता गटाला 28 लाखाचे कर्ज मंजुरी पत्र शाखा व्यवस्थापक कल्पेश शिरसागर यांनी दिले. एकाच वेळी 28 गटाला कर्ज मंजुरी प्रस्ताव देण्याची ही पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिलीच घटना असल्याने सर्वच महिला बचत गटातून याचे स्वागत व आनंद व्यक्त केला जात आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरांजली देसाई तर आभार कृषी व्यवस्थापक दीपक कदम यांनी मानले . शाखा व्यवस्थापक यांनी या कार्यक्रमाचे सर्व श्रेय दीपक कदम यांना दिले. यावेळी बँक मेळाव्याला आयसीआरपी, सुनीता पवार सायली शेटे तसेच 28 समूहातील सर्व महिला उपस्थित बहुसंख्येने उपस्थित होत्या. करकंब विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा करकब च्या तर्फे मास्क चे वाटप केले. सदर हा कार्यक्रम कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करून साजरा करण्यात आला.