*कोल्हापूर परिक्षेत्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर यांनी दिली अजितसिंह देशमुख यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट.....!* *करकंब च्या सोमवार पेठ येथे कॅश डिपॉझिट मशीन (CDM) व नवीन एटीएम ची केली मागणी.*

करकंब /प्रतिनिधी
भारतीय स्टेट बँकेच्या स्थलांतर शाखेचे उद्घाटन करण्यासाठी आलेले कोल्हापूर परिक्षेत्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर -माहेश्वरी प्रसाद व भारतीय स्टेट बँकेचे रिजनल मॅनेजर - राजेश गुप्ता , शाखाधिकारी - संदीप झोडगे यांनी अजितसिंह अमरसिंह देशमुख व अशोक देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी अजितसिंह देशमुख व अशोक देशमुख यांनी करकंबच्या नागरिकांसाठी CDM कॅश डिपॉझिट मशीन व नवीन एटीएम सोमवार पेठ करकंब शहरांमध्ये सुरू करावे अशी मागणी केली. यावेळी या मागणीस बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत करकंब येथील सोमवार पेठ येथे निश्चितपणे याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
सीडीएम मशीन मुळे भरणा करण्यासाठी लागणारी रांग यामुळे कमी होऊन बँकेचा 50 टक्के काम कमी होणार आहे .नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. या मशीनच्या माध्यमातून 24 तास कॅश डिपॉझिट सेवा सुरू राहणार आहे.
यावेळी अमरसिंह देशमुख, नरसाप्पा देशमुख ,अशोक देशमुख ,मिथुन चंदनशिवे सर, इंद्रजीत शहा पत्रकार- मनोज पवार, संतोष व्यवहारे ,प्रीतम महामुनी, प्रथमेश गुजरे, शितल मगदूम, शैलेश महामुनी, अनंत शहा ,चिन्मय शहा , भीमराव मदने, संतोष शिंदे ,नितीन दुधाळ उपस्थित होते.