स्वेरीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग व ऍश्रे चॅप्टर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन आठवडाभर चालणार कार्यशाळा 

स्वेरीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग व ऍश्रे चॅप्टर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन   आठवडाभर चालणार कार्यशाळा 

पंढरपूर: प्रतिनिधी

कोरोना महामारीमधील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग व अमेरिकन सोसायटी फोर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग,पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  दि.१४ जून ते १९ जून २०२१ दरम्यान "एमर्जिंग ट्रेंडस इन थर्मल इंजिनिअरिंग" या विषयावर आठवडाभर मोफत ऑनलाइन 'शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम' चे आयोजन केले असल्याची माहिती  स्वेरीचे संस्थापक सचिव व  अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे दिली. जगभरातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग देखील अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे असते. येत्या दशकामध्ये थर्मल इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रगतीसाठी व त्यामधील संशोधन व उपलब्ध संधी सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा  घेण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेच्या माध्यमातून डॉ. राहुल देव मिश्रा, प्रा. के.के.घोष, डॉ. ए. बी.कणसे-पाटील, डॉ. सुकुमार पती, डॉ.बी.पी. पटनाईक, डॉ. के. ए. सोरटे, डॉ. एस. डी. पाटील, डॉ. ए. बी. उबाळे, प्रा. एस. जी. पवार व प्रा. एन. टी. ढोकणे या तज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेमध्ये देशभरातून विविध राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक व औद्योगिक क्षेत्रातील  मान्यवर व्यक्ती  सहभागी होणार आहेत.
सदर कार्यशाळा ही दररोज चार तास असून गुगल मीट ॲप द्वारे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व  अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली  ऑनलाईन कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यशाळेचे निमंत्रक व मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रवीण ढवळे, ऍश्रे पुणे चॅप्टरचे  महाविद्यालयीन प्रमुख प्रा. दिग्विजय रोंगे, प्रा. सचिन काळे, प्रा. दिगंबर काशीद, प्रा. विक्रम चव्हाण, प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा. शशिकांत जाधव व प्रा.मिलिंद कुलकर्णी आदी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. तांत्रिक व्यवस्थापन श्री. बालाजी सुरवसे, दत्तात्रय गायकवाड हे पाहणार आहेत तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी देखील या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.