*पंढरीत जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आक्रमक**सरकारला दहा दिवसांचा अल्टीमेटम*.. *दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या फेरसर्वेक्षणाची मागणी* .

*पंढरीत जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आक्रमक**सरकारला दहा दिवसांचा अल्टीमेटम*..  *दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या फेरसर्वेक्षणाची मागणी* .

पंढरपूर (प्रतिनिधी)

राज्यसरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी हवेतून केली आहे,
जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे, पंढरपूर तालुका चार तालुक्यात विभागला गेल्याने या तालुक्यावर लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे, पंढरपूर मोहोळ आणि मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जा.. असा इशाराच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी चारही तालुक्यातील लोकप्रतिनिधींना दिला आहे. शिवसेनेकडून याबाबत मोठे आंदोलन छेडण्यात येणार असून, हे आंदोलन चार टप्प्यात पार पडणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा, बार्शी आणि करमाळा या पाच तालुक्यांचा समावेश दुष्काळी यादीत करण्यात आलेला आहे. राज्यातील ४० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. मंगळवेढा तालुक्यातील आतापर्यंतचे राजकारण तर कायमच पाण्यावरून तापले आहे.
या तालुक्यातील परिस्थिती अगदी भीषण आहे. अशा वेळी कोणत्या निकषावर
तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले?असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
राज्य शासनाने संबंध जिल्ह्यातील तालुक्यांचे फेरसर्वेक्षण करावे, आणि पंढरपूर मंगळवेढा आणि मोहोळ तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत करावा, याबाबत शिवसेनेने मोठे आंदोलन पुकारले आहे.
याबाबत सोमवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन, निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला.

दुष्काळग्रस्त तालुक्यातील
नागरिकांना कोणते फायदे होणार, याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माहिती दिली आहे. नागरिकांना पाणीपट्टी, विजबिल, शिक्षण शुल्क यासह अनेक बाबींमध्ये सवलती मिळणार आहेत. पंढरपूर तालुका सांगोला, मंगळवेढा, मोहोळ आणि माढा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. यामुळेच सांगोला मतदारसंघात असणारा भाळवणी जिल्हा परिषद गट दुष्काळी जाहीर झाला नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. चारही मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी पंढरपूर तालुकयाकडे दुर्लक्ष केले असल्याचा ठपका ठेवत, शिवसेनेने याबाबत उग्र आंदोलन छेडले आहे. आता जनतेच्या रोषाला सामोरे जा ... असा इशाराच या चारही लोकप्रतिनिधींना दिला आहे. याप्रसंगी जिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, पंढरपूर शहर प्रमुख रवी मुळे, जयवंत माने, रणजीत बागल, बंडू घोडके, उपशहर प्रमुख तानाजी मोरे, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश चव्हाण, उपशहर प्रमुख पोपट सावंतराव, महीला आघाडी शहर प्रमुख पुर्वा पांढरे, तालुका प्रमुख संगीता पवार, उपशहर प्रमुख उषा मोहीकर, रेहाना आतार, ग्राहक आघाडीचे सिध्दनाथ कोरे, संघटक बंडू घोडके, शरीफा पठाण, उपतालुका प्रमुख अर्जुन भोसले, महंमद पठाण, उमेश काळे, गटप्रमुख शिवाजी जाधव, गटप्रमुख सुधाकर माळी, विठ्ठलचे संचालक दिनकर चव्हाण, विजय बागल, सोमनाथ अनपट, अंकुश साळुंखे, रोपळे विभाग प्रमुख बाळासाहेब पवार, विभागप्रमुख दत्ता कोळेकर, विभाग प्रमुख नागेश रितुंड, शाखाप्रमुख बोहाळी संजय पवार, शाखा प्रमुख बाभूळगाव नामदेव चव्हाण, संतोष कदम, शाखाप्रमुख नांदोरे, दत्तात्रय भिंगारे उपप्रमुख, माजी उपतालुका प्रमुख इंद्रजीत गोरे, युवा सेना जिल्हा समन्वयक फिरोज तांबोळी, स्वप्नील गावडे, उपशहर प्रमुख लंकेश बुराडे, युवासेना समन्वयक  करकंब रणजीत कदम, करकंब विभाग प्रमुख विजय नलवडे, करकंब शहर प्रमुख दत्ता पेठकर, सचिन मोरे, करकंब युवा सेनाप्रमुख अमोल बोडके उपप्रमुख, रुषीकेश कवडे करकंब, शालन जानराव, अमित गायकवाड, ग्रा.पं. सदस्य पोपट इंगोले, जयसिंग पवार, हरिभाऊ गाजरे, दादा आसबे यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.