*करकंब ग्रामदैवत श्री कनकंबा देवी यात्रा महोत्सवास सहा एप्रिल पासून सुरुवात....!* *धार्मिक- सांस्कृतिक मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन.

करकंब /प्रतिनिधी
सालाबाद प्रमाणे यावर्षी ग्रामदैवत श्री कनकंबा देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेला मोठ्या थाटामाटा मध्ये उत्साहात संपन्न केली जाते.
कनक अर्थात सोने अंबा म्हणजे देवी.... कनकंबा देवी हे करकब चे जागृत देवस्थान असून कनकंबा देवीच्या नावावरून करकंब चे नाव पडले आहे.
या देवीच्या यात्रेला गावातील राज्यातील विविध भागातून भक्तगण हे मोठ्या भक्ती भावाने कनकंबा देवीच्या दर्शनासाठी येतात .
चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती दिवशी दिनांक ०६/०४/२०२३ रोजी पहाटे श्री कनकंबा मातेला अभिषेक घालून संध्याकाळी सहा वाजता पालखी मिरवणूक गावातून कनकंबा देवीचा छबिना निघणार आहे. गावातून वाजत- गाजत पालखीची मिरवणूक सोमवार पेठ येथील देशमुख वाड्यामध्ये कनकंबा ट्रस्ट अध्यक्ष- अमरसिंह देशमुख व उज्वलसिंह देशमुख यांच्या वाड्यामध्ये पालखीची विधिवत पूजा-अर्चना व विविध धार्मिक पूजा केली जाते.
ग्रामदैवत चा मान देशमुख घराण्याकडे पूर्वनपार चालत आलेला आहे.
त्याचबरोबर कनकंबा देवी यात्रा महोत्सवामध्ये
दिनांक- 7/4/23 रोजी शुक्रवारी भेदी गाणी कार्यक्रम , दिनांक- 8/4/23 शनिवारी दुपारी- 4 वा जंगी कुस्त्यांचे आयोजन, 9/4/23 रविवार ऑर्केस्ट्रा नीलम जाधव कोल्हापूर , दिनांक-10/3/23 सोमवार दादासाहेब साळुंखे लावण्यखणी कार्यक्रम तसेच दिनांक- 17/3/23 सोमवार मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ असे मनोरंजनाचे कार्यक्रमाचे करकंब व पंचक्रोशीतील भक्तगणांसाठी पंच कमिटीच्या व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे .अशी माहिती अशोकसिंह देशमुख यांनी दिली.
यासाठी पंच कमिटीचे अमोलदादा शेळके ,अजितसिंह देशमुख, बाजीराव खाडे, पांडुरंग शेटे ,शिवाजी सलगर, राजेंद्र खारे, विलास धनवे महबूब बागवान भीमराव मदने, अदिसह परिश्रम घेत आहेत
कनकंबा अर्थात सोन्याची देवी असे आहे. पूर्वी कनकंबा देवी ही सोन्याची देवी होती. परंतु कनकंबा देवीची चोरांनी चोरी केली .व त्यावेळी कनकंबा देवीची सोन्याची मूर्ती चोरट्याने चोरी केली ती चोरलेली मूर्ती मंदिरातून पश्चिमेकडे घेऊन जात असताना ते एका शेतामध्ये वाटपासाठी बसले. त्यावेळी वाटप करत असताना ते चार ते पाच चोरटे जाग्याला शिळा होऊन पडले. त्या शेताला आज चोरदेव म्हणूनओळखले जाते. ची आख्यायिका आजही सांगितली जाते.
आपणाला करकंब येथे गेल्यावर चोरदेवा मध्ये गेल्यानंतर त्याशिळा पहावयास मिळतात.
तसेच कनकंबा देवीचे मंदिर हे हेंमाडपंतथी असून फार पूर्वीपासून चे ऐतिहासिक मंदिर आहे.
या यात्रेनिमित्त पंच कमिटीच्या वतीने व भजलिंग रामचंद्र देशमुख यांचे कडून मंदिरा मध्ये महाप्रसादचे वाटप केले जाते.