*देश सेवेला सीमा नाही.... सेवेतून सुट्टी मिळाली... घराची ओढ लागली.... आणि मध्येच हृदयविकाराने सीमा सुरक्षा दलाचे सब इन्स्पेक्टर चंद्रकांत उर्फ बाळासाहेब माळी (शिंदे) यांना आले वीरमरण....!* *करकंब गावचे देशभक्त चंद्रकांत उर्फ बाळासाहेब माळी होते रहिवासी.*

करकब /प्रतिनिधी
सीमा सुरक्षा दल (बी एस एफ) मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत उर्फ बाळासाहेब दत्तात्रय माळी (शिंदे) हे अंजना जि. अमृतसर सेक्टर (पंजाब) येथून वार्षिक सुट्टी मिळाली.... आणि घराकडे परत येत असताना पुणे येथे आल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांना वीर मरण आल्याने करकंब व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
करकंब येथील सीमा सुरक्षा दलामध्ये (बी एस एफ) मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असलेले करकंब येथील रहिवासी असलेले चंद्रकांत उर्फ बाळासाहेब दत्तात्रय माळी (शिंदे) हे दिनांक 10 फेब्रुवारी 1985 पासून सीमा सुरक्षा दलामध्ये देश सेवा करत असून त्यांची जास्तीत जास्त सेवा ही विशेषता जम्मु-काश्मीर व उत्तर-पूर्व भागात झाली आहे. सेवा पूर्तीची सव्वा दोन वर्ष बाकी असताना चंद्रकांत उर्फ बाळासाहेब माळी यांचे अचानक पणे हृदयविकाराने वीरमरण आले ही घटना मनाला चटका लावून जाणारी आहे. देशभक्त चंद्रकांत उर्फ बाळासाहेब माळी यांच्या सेवेची सव्वादोन वर्षाचा असताना त्यांना घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली. ते पंजाब येथे अमृतसर सेक्टर मध्ये कार्यरत असताना आपली वार्षिक सुट्टी मिळाली, बरीच वर्षे मनाला घराची ओढ होती. एकीकडे देश सेवेला सीमा उरली नव्हती... दुसरीकडे मनाला घराची ओढ... पण आता ना.. घराचा ना कुटुंबाचा विचार न करता अखेरच्या श्वासापर्यंत हृदयामध्ये या देशसेवेला सीमा नाही. अखेरपर्यंत वीरमरण आलेले चंद्रकांत उर्फ बाळासाहेब माळी यांचे देश सेवेचे हे कार्य करकंब व पंचक्रोशीतील लोकांना कायम स्मरणात राहील.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी दोन मुले भाऊ असा परिवार आहे.