*सामान्य घरातला माणूस सुद्धा असामान्य कर्तुत्व करू शकतो - छत्रपती संभाजी राजे* - करकंब येथील जगताप सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन

करकंब(प्रतिनिधी) :-
सामान्य घरातला माणूस सुद्धा असामान्य कर्तृत्व करू शकतो. करकंब सारख्या ग्रामीण भागात असे धाडस करणे सोपे नाही. मुंबई- पुण्याच्या धरतीवरआज ग्रामीण भागात रुग्णांच्या विविधआजारांच्या उपचारासाठी या जगताप मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सर्व सेवा - सुविधा उपलब्ध केलेल्या मला पाहून मला खूप आनंद झाला असल्याचे सांगून सामान्य घरातला माणूस सुद्धा असामान्य कर्तुत्व करू शकतो हे डॉक्टर पांडुरंग जगताप व आरती जगताप परिवाराने करून दाखवले असल्याचे मत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले.
करकंब येथील जगताप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भव्य उद्घाटन सोहळ्याप्रसंगी छत्रपती संभाजीराजे भोसले बोलत होते. यावेळी आ.बबनदादा शिंदे,विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील,माढा पंचायत समिती सभापती विक्रमसिंह शिंदे,प्रा.शिवाजीराव काळुगे,माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे,माजी नगरसेवक किरणराज घाडगे,संदीप पाटील,सपोनि निलेश तारू,सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख,रासपचे तालुका अध्यक्ष ऍड. शरदचंद्र पांढरे,राहुल पुरवत,अमोल शेळके,महादेव तळेकर,अजय जाधव डॉ. सुरज रोंगे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, तुम्ही सर्वजण हे हॉस्पिटल पाहून घ्या, ऑपरेशन थेअटर, मोठ्या शस्त्रक्रिया साठी वेगळे युनिट केले आहेत. हॉस्पिटलमध्ये केलेली मांडणीमध्ये कुठेही डॉ.जगताप व सौ. जगताप यांनी कसलीही कमतरता भासू दिलेली नाही.
एका सर्वसामान्य शेतकरी कुठूबातील मुलगा डॉ होऊन पुणे मुंबई सारख्या शहरात पैसे कमविण्यासाठी न जाता ग्रामीण भागातील लोकांच्या रुग्ण सेवेसाठी करकंब सारख्या ग्रामीण भागात मोठी गुंतवणूक करून सुसज्ज व सर्व सुविधानयुक्त मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती केली.
या हॉस्पिटलच्या निर्मिती बाबत छत्रपती संभाजीराजे यांनी डॉ .पांडुरंग जगताप व डॉ.आरती जगताप यांचे भरभरून कौतुक केले.या कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.