*गावचे सुपुत्र उद्योजक राजू खरे यांचा रोपळेत जंगी स्वागत*! *क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये उद्घाटन प्रसंगी मारला चोकार आणि षटकार*

पंढरपूर/प्रतिनीधी
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी उपस्थिती लावली होती. आपल्याच गावचे सुपुत्र असल्याने रोपळे गावात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.
रोपळे ग्रामस्थांकडून फटाक्याच्या आतषबाजी व हलगीच्या तालावर खरे यांची जंगी स्वागत करत मिरवणूक काढण्यात आली, यावेळी निमित्त होतं ते फक्त रोपळे गावच्या क्रिकेट सामन्याचं, क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी राजू खरे आले असता, रोपळे गावचे माजी सरपंच व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांनी ग्रामस्थांचे वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. त्यानंतर गावातील मुख्य चौकामध्ये असलेले भगव्या झेंड्याला पुष्पहार घालत माजी सरपंच व कल्याणराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर कदम यांच्या कार्यालयास भेट दिली .
यावेळीही आदरपूर्वक सन्मान करण्यात आला
.
यानंतर गावामध्ये मुख्य चौकातून राजू खरे यांची मिरवणूक काढत, गावातील मातंग समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ हे पार पडला. यावेळी गावातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली .यानंतर रोपळे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मैदानात ग्रँड एन्ट्री करण्यात आली, यावेळी क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करत राजू खरे यांनी आपल्या हातात बॅट घेत तुफान फटकेबाजी करत चौकार आणि षटकारही लगावले.
राजू खरे यांचं क्रिकेट प्रेमींकडून आपल्या अंगात परिधान केलेल्या जर्सीच्या माध्यमातून दाखवून देण्यात आले. स्पर्धेची सुरुवात दोन्ही टीम्सना शुभेच्छा देऊन करण्यात आली.
क्रिकेट प्रेमींकडून व रोपळे गावचे सुपुत्र व पुणे पिंपरी चिंचवडचे माजी भूमी अभिलेख अधिकारी शिवाजी भोसले यांच्या वतीनेही सत्कार सोहळा पार पडला.कार्यक्रमासाठी रोपळे सह मान्य गावातील विविध पक्षाचे मान्यवर, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी राजू खरे यांच्या नावाची चर्चा आता मोहोळ तालुक्यासह आता पंढरपूर तालुक्यासह माढा मतदारसंघामधील गावामध्ये होताना दिसून येत आहे.