*बाळे पतसंस्था राज्यातील सहकारी पतसंस्थेस दिशादर्शक ड्रीम मॉडेल बनवणार ; माजी आमदार दत्तात्रय सावंत* *बाळे पतसंस्थेत माजी आमदार दत्तात्रय सावंत सेवाभावी कृती पॅनलचा दणदणीत विजयी*

सोलापूर ;( विजय रूपणुर)
सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या माध्यमिक शिक्षक व सेवकांच्या पतसंस्थेच्या निवडणुकीत मिळालेला विजय हा सभासदांचा आहे. शिक्षकांच्या आर्थिक व्यवहाराची अर्थवाहिनी असलेली पतसंस्था अधिका अधिक सक्षम बनविण्यावर भर राहील. प्रत्येक सभासदांचा पैसा हा सुरक्षित राहील याची हमी प्राधान्याने माझी असेल. निवडणुकीदरम्यान विरोधकांनी चुकीचे व अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला त्या प्रचारास सभासदांनी मतपेटीतून उत्तर व त्यांची जागा दाखवून दिली आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीत आपल्या पॅनलने कर्जाचा १४% व्याजदरावरून ८टक्के इतका व्याजदर कमी केलेला आहे . या पंचवार्षिकमध्ये काम करत असताना हा व्याजदर आणखी कसा कमी येईल याकडे अधिकाधिक लक्ष देणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृती समन्वय समितीचे सर्वेसेवा व शिक्षक माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले.
ते सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व सेवकांच्या पतसंस्था बाळे या पतसंस्थेत माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या कृती पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळाल्यानंतर विजयी सभेत बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार माजी आमदार सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
सहकार क्षेत्रातील अतिशय महत्वाची पतसंस्था व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बाळे पतसंस्थेची मतमोजणी सोमवारी बाळे येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण गावडे यांनी काम पाहिले.
चुरशीचा आणि प्रतिष्ठेचा सामना या निवडणुकीत रंगला होता परंतु एकतर्फी आणि एक हाती सत्ता माजी आमदार सावंत सेवाभावी कृती पॅनलने मिळवली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाल्यापासून सेवाभावी कृती पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी मोठ्या फरकाने आघाडी घेतली होती. माजी दत्तात्रय सावंत प्रणित सेवाभावी पॅनलचे १६ संचालक निवडून आले आहे.
स्पष्ट निकाल हाती येताच माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या समर्थकांनी फटाक्याची बाजी व गुलालाची उधळण करण्यात आली तदनंतर सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
विजयी उमेदवाराच्या सभेत माजी आमदार सावंत म्हणाले, या पतसंस्थेच्या सर्व सभासदांचे जोपासलं जाणार आहे. संचालकांनी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता व मानधन घेतलं जाणार नसल्याचं ग्वाही यावेळी सभासदांना देण्यात आली सभासदांनी टाकलेला विश्वास विश्वासास पात्र राहणार असल्याचे मत सर्व संचालकाने व्यक्त केले.
चौकट
सर्वात जास्त ९८२ मताधिक्य राजेंद्र माळी यांना ; मंगळवेढा येथे सभासदांनी केला जल्लोष
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बाळे पतसंस्थेच्या निवडणुकीत आमदार माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रणित सेवाभावी कृती पॅनलचे १६ उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत यावेळी मंगळवेढा तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातून राजेंद्र हरिभाऊ माळी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार अडसूळ बाळासाहेब मच्छिंद्र यांचा ९८२ इतक्या प्रचंड मतांनी पराभव केला आहे.विजयी उमेदवार राजेंद्र माळी यांना १७१३ इतकी मते घेऊन जिल्ह्यातील सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार ठरले आहेत. या विजयानंतर मंगळवेढयातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली