*स्व. वसंतदादा काळे यांच्या प्रती नागेशदादा फाटे यांनी व्यक्त केली भावना*

*स्व. वसंतदादा काळे यांच्या प्रती नागेशदादा फाटे यांनी व्यक्त केली भावना*

पंढरपूर/प्रतीनीधी

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत दादा तुमच्या व कल्याणराव काळे साहेबांच्या आशीर्वादाने सभासदांनी भरघोश मताने आम्हाला निवडून दिले.
      दादा एक सामान्य सभासद ऊस उत्पादक शेतकरी ऊस वाहतूकदार ते कारखान्याचा संचालक इथ पर्यंतचा प्रवास हा माझा एकट्याचा नसून दादा तुमच्या आशीर्वादाचा व कल्याणराव काळे साहेब यांच्या विश्वासाचा सभासदांच्या आशीर्वादाचा आहे .
  दादा आपण सुरुवातीपासूनच वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन , दिलेला आशीर्वाद आपल्यावर निष्ठा ठेवून मी करत असलेली वाटचाल ही नक्कीच मला भविष्यातील उभारी देणारी आहे.
दादा आपल्या हयातीत मिळालेलं अमूल्य मार्गदर्शन व कल्याणराव काळे साहेबांची मिळालेली भक्कम साथ
व सभासदांच्या आशीर्वादाने मी जरी संचालक झालो असलो तरी आपल्या कारखान्यावरील शक्ती स्थळावर नतमस्तक होताना आपल्या कर्तुत्वाची त्यागाची जाणीव मला अंतर मनानं झाली.तीच जाणीव भविष्यातील प्रत्येक पदाला न्याय देण्यासाठी शिदोरी म्हणून वापरेल .
दादा सामान्य सभासदांप्रती असलेली निष्ठा कल्याणराव काळे साहेबांचा आशीर्वाद या जोरावर या कारखान्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आपल्या शक्तिस्थळावर नतमस्तक होताना सर्वांगीण हित जपण्याचा संकल्प करतो .
सभासदांचा सन्मान, कारखान्याची भविष्यातील प्रगती यासाठी अखंडपणे परिश्रम घेऊन आपलं कारखान्या विषयीच असलेलं स्वप्न मी चेअरमन कल्याणरावजी काळे साहेब व सर्व संचालक मंडळ पूर्णत्वास नेव्हून,
भविष्यात हा कारखाना सोलापूर जिल्ह्यात व महाराष्ट्रात अग्रेसर कारखाना म्हणून ओळखला जाण्यासाठी या कारखान्याच्या प्रवेशद्वारावर नतमस्तक होऊन या कारखान्याचा कामगार प्रशासन या कारखान्याची मशनरी यांना विनम्र पूर्वक अभिवादन करून ,सर्वांची साथ सोबत मिळावी ही अपेक्षा व्यक्त करतो .
    स्वच्छ बंधन सजीव हात निर्जीव वस्तूलाा लागला तर या दोन्ही गोष्टीतील गूण हा भविष्यातील यशासाठी कारणीभूत ठरतो .
भविष्यातील प्रत्येक संकटाला आव्हान समजून त्या संकटातून मार्ग काढण्यासाठी बळ मिळावे हीच अपेक्षा .. कार्यस्थळावरील प्रवेशद्वारावर नतमस्तक होऊन चेअरमन कल्याणराव काळे व सर्व संचालक मंडळ एकत्रित रित्या सर्व समावेशक प्रयत्न करू .
आजच्या अभिवादनात उद्याचा उज्वल भविष्यकाळ अंतरी बाळगून भविष्यातील वाटचालीस आम्ही आपल्या साक्षीने सुरुवात करतोय .
आपणा सर्वांचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत आहेच तो भविष्यातही राहावा हीच सर्वांना विन:म्रता पूर्वक प्रार्थना ..