*श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकारांचा सन्मान.* *श्री शाकंभरी (चौंडेश्वरी)पौष पौर्णिमा करकंब कोष्टी समाजाच्या वतीने उत्साहात सांगता.*

करकंब/ प्रतिनिधी :-
*करकंब:-येथील श्री. चौंडेश्वरी पौष पौर्णिमा उत्सव निमित्ताने गेल्या सप्ताहात विविध सांस्कृतिक, आध्यात्मिक,आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले श्री. चौंडेश्वरी मातेची पालखी नगरप्रदक्षिणा संपन्न झाली,यावेळी अनेक पुरुष महिला, बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि सर्व कार्यक्रमांची आज सांगता वेळी पत्रकार दिनाच्या निमित्ताने करकंब मधील मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष - मनोज पवार, करकंब विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष-लक्ष्मण जाधव, ता. सचिव -राजेन्द्र करपे ता. प्रसिद्धीप्रमुख-गोपीनाथ देशमुख, ता. उपाध्यक्ष -बाळासाहेब काशीद ,श्रमिक पत्रकार संघटनेचे ता. उपाध्यक्ष-सचिन शिंदे, कार्याध्यक्ष-डॉ.नितीन खाडे ,तालुका संघटक-लक्ष्मण शिंदे ,गणेश माने,आदी पत्रकार बांधवांचा सत्कार फेटा हार श्रीफळ देऊन मा. अध्यक्ष -मिलिंद उकरंडे, सचिव- विजय भागवत, संतोष बुगड,धनंजय इदाते, प्रभाकर टेके, संतोष पिंपळे, जगन्नाथ दुधाणे, अशोक म्हेत्रे, ज्ञानेश्वर दुधाणे ,अभिजित टेके, यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले. की श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट करकंब यांचे वतीने वर्षातून अनेक वेळा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित करत आहेत. आणि त्या माध्यमातून महिलांना स्वत:चे स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते . यावेळी मिलिंद उकरंडे, प्रभाकर टेके, यांच्या मनोगतात सांगितले की चौंडेश्वरी पतसंस्था समाजबांधवांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावत आहे,तसेच सर्व समाजबांधवांनी काही अडचणी असतील तर नक्की मदत करुन सहकार्य केले जाईल सांगितले, ज्ञानेश्वर दुधाणे यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असून समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घडामोडी आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका पत्रकार करत असतात, पत्रकारांच्या माध्यमातून करकंब मधील सर्व घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील गावागावात पोहचवण्यासाठी आणि करकंब गावच नाव उज्वल करण्यासाठी सिंहांचा वाटा आहे .असं सांगितलं . त्यामध्ये करकंब पत्रकार संघाची नुकतीच निवड झालेल्या पत्रकार बंधूंचेही अभिनंदन केले,आणि शुभेच्छा दिल्या .सुत्रसंचलन- संजीवकुमार म्हेत्रे सरांनी करून विजय भागवत यांनी आभार मानले, यावेळी आरती करुन जगन्नाथ दुधाणे आणि संजय दुधाने यांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी समस्त कोष्टी समाज बांधव पुरुष आणि महिला त्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.*