*बार्डी येथील विद्यानंद विद्यालयामध्ये जिल्ह्याचे अभ्यासू नेते प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटपासह विविध सामाजिक उपक्रमाने साजरा*

करकंब/ प्रतिनिधी
:-सोलापूर जिल्ह्याचे अभ्यासू नेते व माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बार्डी ता पंढरपूर येथील विद्यानंद माध्यमिक विद्यालय बार्डी या प्रशालेत शालेय विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*
*सुरुवातीस जिल्ह्याचे अभ्यासू नेते व माजी आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री .दिनकर दादा कवडे व या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कालिदास कवडे सर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप, व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व पालक ,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.*