*युवराजदादा पाटील यांनीही गावोगावी समर्थकांच्या घेतल्या भेटी* *माढा मतदार संघातील ४२गावातील कार्यकर्त्यांना तुतारीला मताधिक्य देण्याचे केले आवाहन*

*युवराजदादा पाटील यांनीही गावोगावी समर्थकांच्या घेतल्या भेटी*  *माढा मतदार संघातील ४२गावातील कार्यकर्त्यांना तुतारीला मताधिक्य देण्याचे केले आवाहन*

पंढरपूर/प्रतिनीधी

पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल सह साखर कारखान्याचे संस्थापक कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हा वर्ग परंपरागत खा. शरद पवार यांना मानणारा आहे. या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी कर्मवीर आण्णाचा गट भक्कमपणे उभा रहावा यासाठी युवराजदादा पाटील यांनी गावोगावी जावून आवाहन केले आहे.
      पंढरपूर तालुक्यातील कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील  यांच्या गटाचे नेतृत्व  युवराजदादा पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांचेसाठी स्वतः पाटील हे गावागावात जावून तुतारीला मत देण्याबाबत आवाहन केले आहे. 
     विठ्ठल परिवारातील अतिशय महत्वाचे स्थान युवराजदादा पाटील यांना आहे.  मोठी ताकद असल्याने त्यांच्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या मताधिक्य देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यांच्या आवाहनाला मतदार मोठा प्रतिसाद देत असल्याने, माढा लोकसभा मतदार आणि सोलापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि आ. प्रणिती शिंदे यांना होत असल्याचे दिसून येत आहे.