*करकंब येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन....!*

करकंब/ प्रतिनिधी:
-येथील श्री संत रोहिदास नगर येथे श्री संत रविदास प्रतिष्ठानच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सुरुवातीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिवरत्न तरुण मंडळाचे अध्यक्ष नितीन गुळमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भावी पंचायत समिती सदस्य पैलवान औदुंबर कुंभार, मार्गदर्शक महादेव कुलकर्णी (बी.के.), माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण शिंदे, शिवराज शिंदे, संदीप अभंगराव संतोष राजगुरू विकास शिंदे सचिन चरपे दिनेश कांबळे तुकाराम शिंदे अविनाश जाधव संजय जगताप आयुब मणेरी अमीन बागवान समाधान शिंदे आदिसह बहुसंख्य समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते.