*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेना पंढरपूर तालुका अध्यक्षपदी सचिन माळी यांची निवड* *करकंब येथील त्यांच्या निवडीने विद्यार्थी युवा वर्गातून स्वागत.*

करकंब /प्रतिनिधी
करकंब येथील धडाडीचे कार्य करणारे सचिन पोपट माळी. यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना पंढरपूर तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील तालुका उपाध्यक्ष हेमंत पवार बालाजी पवार किरण घाडगेओंकार जाधव लखन चौगुले स्नेहदीप व्यवहारे आदीसह बहुसंख्य मनसे सैनिक उपस्थित होते. सचिन माळी यांच्या निवडीने करकंब व परिसरातून अभिनंदन केले जात आहे.