*ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल व ज्युनिअर कॉलेज ला राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार जाहीर* *अल्पावधीतच शैक्षणिक गुणवत्तेचा दबदबा निर्माण करणारी आदर्श शाळा*

*ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल व ज्युनिअर कॉलेज ला राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार जाहीर* *अल्पावधीतच शैक्षणिक गुणवत्तेचा दबदबा निर्माण करणारी आदर्श शाळा*


 करकंब /प्रतिनिधी

,नांदोरे ता. पंढरपुर येथील जयहिंद प्रतिष्ठान, नांदोरे संचलित ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल व ज्युनिअर कॉलेज ला राष्ट्रीय स्नेहबंध आदर्श उपक्रमशील संस्था सन्मान २०२१- २२ पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण भिंगारे यांनी दिली.
स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, प्रामाणिकपणा ही तत्त्वे पाळणारा, पर्यावरणस्नेही, कलासक्त, श्रमप्रतिष्ठेचे मोल जाणणारा, ज्ञानपिपासू विद्यार्थी व शिक्षक घडविणे हे नांदोरे येथील जयहिंद प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे  स्वप्न आहे. हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी शाळा विविध उपक्रमांचे आयोजन करते. पंढरपूर तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत
नांदोरे परिसरात ही शाळा आहे. या शाळेचे आजवर अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चमकले असल्याने ग्रामीण भागात सर्वाधिक पालकांची पसंती या शाळेला आहे या शाळेत 50 टक्के विद्यार्थी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील आहेत. इंग्रजी  माध्यमाची असूनही विविध उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थी संख्या दरवर्षी वाढते आहे. शाळेचे काही उपक्रम थोडक्यात असे.
भावपूर्ण गुरुपौर्णिमा,
वृक्षबंधन ,
विविध गुणदर्शन ,विद्यार्थी-शिक्षकांच्या कलागुणांना व्यासपीठ ,मिळावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन 
विज्ञान प्रदर्शन ,
नावीन्याचा ध्यास ,विद्यार्थी-शिक्षकांना नवनवीन माहिती उपलब्ध करून देण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने, शिक्षकांसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण शाळा सतत आयोजित करीतच असते. या प्रेरणेतून शाळेच्या  उपक्रमांमुळे गेली सहा वर्षे सातत्याने येथील शिक्षक काम करत आहेत त्यामुळेच  ‘  'राष्ट्रीय स्नेहबंध आदर्श उपक्रमशील संस्था सन्मान २०२१- २२  : सन्मा. ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज नांदोरे ,पंढरपूर शाळेचा  पुरस्कार मिळत आहे.