*करकंब येथील नंबर दोन विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी युवा नेते अभिषेक पुरवत तर व्हा चेअरमन पदी संजय बोचरे यांची निवड.* *पंढरपूर तालुक्याचे भिष्माचार्य.. सहकार रत्न... माजी पंचायत समिती सभापती ....यांचे नातू अभिषेक पूरवत चेअरमन पदासाठी निवड...!*

करकंब/ प्रतिनिधी:
-येथील करकंब नंबर दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमनपदाची धुरा सलग तिसऱ्यांदा युवा नेते अभिषेक पुरवत यांच्यावर सोपवण्यात आली. व्हाईस चेअरमन पदासाठी संजय बोचरे
यांची निवड करण्यात आली.
यावेळी प्रभाकर टेके जगन्नाथ दुधाने रघुनाथ शेटे चंद्रकांत पांढरे संदीप शिंगटे वरुण पुरवत माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील मोहिते,बाहुबली पुरवत माजी ग्रामपंचायत सदस्य वसंत दादा शिंदे, प्राध्यापक सतीश देशमुख सारंग पूरवत विजय मोकळे कल्पना टेके तृप्ती पुरवत आदींसह संचालक मंडळ बहुसंख्य सभासद ग्रामस्थ उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्याचे भिष्माचार्य, सहकार रत्न, पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती कै. कृष्णात भाऊ पुरवत यांचे नातू असलेले युवा नेते अभिषेक पूरवत यांची या सोसायटीच्या चेअरमनपदी सलग तिसऱ्यांदा निवड झाल्याने युवा नेते अभिषेक पूरवत यांनी सहकार रत्न कै. कृष्णात भाऊ पूरवत यांच्या विचाराचा वारसा घेऊन व तालुक्यातील ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन घेत सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या सहकार्याने या संस्थेच्या माध्यमातून यापुढे काम करणार असल्याचे यावेळी सांगितले.